*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
प्रत्येक प्रॉब्लेमला आहे सॉल्यूशन...स्टार प्रवाहची नवी मालिका वैजू नंबर वन
ऑफिसच्या वेळा, मुलांचं शिक्षण, महिन्याचं बजेट, भविष्याची तरतूद टेन्शनची कारणं एक ना अनेक. धकाधकीच्या जीवनात निरागस हास्य आणि निवांत क्षण कुठेतरी हरवत चालले आहेत. तुमच्या याच समस्येवर धमाल मनोरंजनाचं औषध घेऊन येतेय ‘स्टार प्रवाह’वर सुरु होणारी नवी मालिका ‘वैजू नंबर वन’. खरतर आयुष्यात आपण प्रत्येक जण खूप सारी स्वप्न पहात असतो. काही जणांची स्वप्न पूर्ण होतात काही मात्र आयुष्यभर या स्वप्नांचा पाठलाग करत रहातात. ‘वैजू नंबर वन’ मालिकेतली वैजू स्वप्नाळू आहेच पण प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचा मजेशीर मार्गही तिच्याकडे आहे. साताऱ्यात वाढलेल्या वैजूला खरतर पोलिस सेवेत जाण्याची इच्छा होती. काही कारणामुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. मात्र पोलिस खात्यातील मुलाशी लग्न करुन तिने ती पूर्ण करुन घेतली. साताऱ्याहून मुंबईतल्या तिसरी मंजिल चाळीत आल्यावर तिने आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांनाच आपलसं करुन घेतलं. प्रॉब्लेम कोणताही असो वैजूकडे प्रत्येक प्रॉब्लेमवर सॉल्यूशन असतं. त्यामुळेच संपूर्ण चाळीत ती नंबर वन ठरते.
PROMO: https://www.facebook.com/StarPravahOfficial/videos/530549867600627/
PROMO: https://www.facebook.com/StarPravahOfficial/videos/196620841565377/
तिसरी मंजिल चाळ नावाप्रमाणेच थोडी फिल्मी आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेली मंडळी या तिसरी मंजिलमध्ये अगदी गुण्यागोविंदाने रहातात. टोलेजंग इमारतींच्या शहरात चाळसंस्कृती हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. चाळ हा प्रत्येकाच्या मनातला असा एक हळवा कोपरा आहे ज्याच्या आठवणी पुसणं हे केवळ अशक्य आहे. वैजू नंबर वन मालिकेतलं हे २२ खोल्यांच कुटुंब तुम्हाला नक्कीच निखळ मनोरंजन देईल. दैनंदिन आयुष्यतल्या घडामोडीं मजेशीर पद्धतीने या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येतील.
वैजू नंबर वन मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘वैजू नंबर वन एक हल्की फुल्की आणि आपल्या आजुबाजूला घडणारी गोष्ट आहे. अतिशय प्रेमळ आणि रोजच्या जीवनात होणाऱ्या गोष्टींशी निगडीत असलेली कथा. धकाधकीच्या आयुष्यात तुमचं टेन्शन विसरायला लावेल अशी ही मालिका आहे.’
सोनाली पाटील ही नवोदित अभिनेत्री वैजू शिर्केची भूमिका साकारत असून समीर खांडेकर वैजूच्या पतीच्या म्हणजेच सुशील शिर्केच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच ईला भाटे, अविनाश नारकर, मिहिर राजदा, प्रभाकर मोरे, संजीवनी जाधव, श्रीजीत मराठे, नीता पेंडसे, संजय कुलकर्णी, भरत सावले, मीनल बाळ अशी दमदार कलाकारांची फौज मालिकेत दिसणार आहे. होलाका क्रिएशन्सने या मालिकेची निर्मिती केली असून संजय जाधव, प्रोमिता जाधव, हर्षदा खानविलकर आणि दिपक राणे या मालिकेचे निर्माते आहेत. वैभव चिंचाळकर या मालिकेचे दिग्दर्शक आहेत.
तेव्हा मनोरंजनाची ही अनोखी मेजवानी पहायला विसरु नका. नक्की पहा नवी मालिका ‘वैजू नंबर वन’ सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*