बिझनेस बियॉन्ड इंडस्ट्री ४.० ' विषयावर पुण्यात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद* 

Invite


*'बिझनेस बियॉन्ड इंडस्ट्री ४.० ' विषयावर पुण्यात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद* 
..............................
 *अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसच्या वतीने आयोजन*  


पुणे :


महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसच्या वतीने 'बिझनेस बियॉन्ड इंडस्ट्री ४.०' विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद  २९ फेब्रुवारी रोजी हॉटेल अरोरा टॉवर्स येथे होणार आहे. 


या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन २९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता हॉटेल अरोरा टॉवर्स येथे मर्सिडीझ बेंझ कंपनीचे  सरव्यवस्थापक डॉ. उमेश देशपांडे यांच्या हस्ते होणार असून  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार अध्यक्ष स्थानी असणार आहेत. 


  अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस'चे संचालक डॉ. आर.गनेसन यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. चेकमेट २०२० या नावाने होणाऱ्या या परिषदेचे हे १२ वे वर्ष आहे. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार,उद्योग आणि शैक्षणिक जगतातील मान्यवर,व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी,प्राध्यापक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. ३० संशोधक आपले निबंध सादर करणार आहेत. महिला सक्षमीकरण क्षेत्रातील डॉ. मीरा वेंकट आणि ग्रामविकास,रोजगार निर्मिती क्षेत्रातील टाटा ट्रस्टस च्या  विकासान्वेष फाउंडेशन चे वरिष्ठ सल्लागार डॉ.अजित कानिटकर यांचा सन्मान या परिषदेत करण्यात येणार आहे. 



................................................