जगाबरोबर राहून 19 फेब्रुवारी शिवजयंती साजरी करूया.....मा.प्रशांत धुमाळ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


फोटो साभार  :#बाळा_पवार


शिवजयंती म्हणजे सकाळी लवकर उठून छत्रपतींच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणे आणि आणि शिवजयंती साजरी झाली असे गृहीत धरून पुढील कामाला लागणे.
यात शिवछत्रपतींची प्रतिमा ठेवणे आणि छत्रपतींचा पुतळा एखाद्या मंडळाकडे सुस्थित मिळणे म्हणजे भाग्य त्यातही 19 फेब्रुवारीला शिवजयंती करणे म्हणजे सरकारी शिवजयंती असा शिक्का आणि या शिवजयंती बद्दल एवढी जागृती नव्हती ठराविक जिल्हे,तालुके मध्ये जयंती होयची आणि ही जयंती करांना तेवढाच विरोध सुद्धा त्या त्या भागातील होत असे.
              *पण गेल्या 15 वर्षात मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडच्या सर्व वक्ते यांनी जे प्रबोधन समाजामध्ये केले त्याचा परिणाम आता दिसून आला. आणि शिवजयंती हा एक लोकोत्सव झाला बघता बघता प्रतिमेला किंवा अर्ध पुतळ्याला हार घालून शिवजयंती साजरी करणारे आता शिव सप्ताह आयोजित करू लागली आहेत* यात आरोग्य शिबिर ,लहान मुलासाठी स्पर्धा ,महिलांच्या कलागुणांना वाव देणे यासाठी स्पर्धा, त्याचबरोबर छत्रपतींच्या विविध पैलूंवरती प्रकाश टाकणाऱ्या व्याख्यानमाला, शिवकालीन शास्त्राचे प्रदर्शन, गडकोट किल्ल्यांची प्रदर्शन, याचा आयोजन होऊ लागलं.यातून लोक सहभाग वाढला आणि यात महिलांचा विशेष असा सहभाग व सातत्य राहून शिवजयंती वाडी- वस्ती गावापासून तालुका - पर्यंतच नव्हे तर परदेशातही शिवजयंती मोठ्या उत्सहात  साजरी होऊ लागली 
*यात फेसबुक आणि अलीकडच्या काळात व्हाट्सअप मुळे अनेक लोकांचं प्रबोधन होऊन जागृती लोकांना तिथी आणि तारखेचा निरर्थक वाद कळाला आणि लोकांनी जगाबरोबर राहून 19 फेब्रुवारी शिवजयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला.*
येणाऱ्या काळात 19 फेब्रुवारीची शिवजयंती हा राष्ट्रीय सण म्हणून कन्याकुमारी ते कश्मीर,मुंबई ते  मद्रास आणि जगाच्या कानाकोपऱ्यात शिवजयंती साजरी होईल


#शिवजयंती_घराघरात_शिवजयंती_मनामनात


Popular posts
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..* *शुभेच्छुक:-........ संपादक संतोष सागवेकर ,सा.पुणे प्रवाह परिवार.....
Image
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
महावितरण वीज बिलाचा भरणा करावा व कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास टोल-फ्री क्रमांक १८००१०२३४३५ / १८००२३३३४३५ चा वापर करावा.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या