एक अपघातग्रस्त मुलाच्या पालकाची आपणा सर्वांना नम्रविनंती आहे की आपल्या पाल्यांना *विना हेल्मेट* वाहन देऊच नका🙏🙏🙏

माणुसकीच्या नावाला जिथ *काळीमा* फासणारी लोक असतात तेथेच, *जात पात न बघता फक्त अपघातग्रस्त मुलं कशी वाचतील याची जीवापाड धडपड करणारा फरीस्ते सुध्दा असतात.* 
होय, दिनांक *१९ डिसेंबर २०१९, दुपारी ३:३० वाजता, दिघी मॅगझिन चौकाच्या एक कि.मी.आधी* माझ्या मुलाचा टु व्हिलर अपघात गाडी रस्ता दुभाजकास घासल्या मुळे तोल जाऊन झाला. मुलं दुभाजकावर आपटली गेली.
भर रस्त्यावर *मुलं रक्ताच्या थारोळ्यात* पडलेली होती. पण रस्तावरुन जाणारी माणसं *कोणीही थाबंत नव्हती.* *मुल २० मिनट पडुन होती.* 
पण, *तळेगावंचा सुरेश* फरीस्ता बनुन अवतरला. 
तो धावुन गेला आणि प्रत्येक वाहन मदतीसाठी थाबंवत होता. *पण एक ही वाहन-व्यक्ती मदतीसाठी थाबंत नव्हता.* 
 *शेवटि या फरीस्त्याने रस्त्यावर आडवा होऊन एक फोर व्हीलर आडवुन मुलांना विश्रांतवाडी मधील हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊन मुलांचे कुटुंब येण्यापूर्वी प्रथमोपचार करण्यास सुरुवात केली.*
मग पुढे जहांगीर, KEM, पुना हॉस्पिटल मध्ये पुढिल उपचारासाठी दाखल करण्यात आले.
 *वेळीच* या फरीस्त्याने मुलांना दवाखान्यात दाखल केल्यामुळे या दोन मुलांचा जीव वाचला.
 *पण, खुप आश्र्चर्य वाटलं की पुण्यासारख्या सुसंस्कृत पुण्यनगरीत अशा प्रसंगी फक्त बघ्याची भूमिका घेणारे पुणेकर कसे असु शकतात ?* 🤔😳😞
तरी *सुखद* गोष्ट ही पण की *तळेगांवचा सुरेश आणि माऊलींच्या नगरीतील फोरव्हिलर वाहक चेतन* फरीस्त्यासारखे अवतरले.
 *मी आणि माझा परीवार सदैव याचां ऋणी राहीन.* 
🙏🙏🙏🌹
 *नोट:* एक अपघातग्रस्त मुलाच्या पालकाची आपणा सर्वांना नम्रविनंती आहे की आपल्या पाल्यांना *विना हेल्मेट* वाहन देऊच नका🙏🙏🙏.
 *एक लाईफ सर्जरी करून पुन्हा परत आलेल्या मुलाचा पालक.* 
गौस भाई येरवडा
पुना शहर अध्यक्ष (IMF)