नेरळ सारख्या मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असलेल्या नेरळ ग्रामपन्चायत मध्ये थेट सरपंच पदावर निवडून आलेले सरपंच रावजी शिंगवा हे जनता दरबार भरवणार आहेत
  नेरळ सारख्या मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असलेल्या नेरळ ग्रामपन्चायत मध्ये थेट सरपंच पदावर निवडून आलेले सरपंच रावजी शिंगवा हे जनता दरबार भरवणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीपासून त्यांचा हा उपक्रम सुरु होणार असून पंधरा दिवसांनी हा जनता दरबार नेरळ शिवसेना शहर कार्यालयात भरला जाईल अशी माहिती सरपंच रावजी शिंगवा यांनी दिली. 

                       शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती सोहळ्याची तयारी करण्यासाठी नेरळ येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी आघाडी मधून ग्रामपंचायत वर निवडून गेलेल्या पार्वती अरुण पवार यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता.त्यांचा नेरळ शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी शहर प्रमुख रोहिदास मोरे,शहर संपर्क प्रमुख किसन शिंदे,उपशहर प्रमुख बंडू क्षीरसागर यांच्यसह माजी तालुका प्रमुख भगवान चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे,शिवाली रासम पोतदार,जयश्री मानकामे,माजी उपसरपंच केतन पोतदार,प्रीती देसाई,राजेश मिरकुटे,जेष्ठ शिवसैनिक चिंधू बाबरे,संदेश लाड,ऋषिकेश कांबळे,युवासेना शहर अधिकारी विश्व्जीत नाथ,आदी उपस्थित होते. यावेळी नेरळ गावातील कुंभारआळी भागातील कार्यकर्ते विलास पाटणकर यांनी शिवसेनेत प्रवेश केले. त्यांचे स्वागत शिवसेना शाखेत करण्यात आला. 

                   त्यानंतर २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती उत्सव कशापद्धतीने साजरा केला जाणार याची रूपरेषा किसन शिंदे यांनी दिली. त्यावेळी माजी तालुकाप्रमुख भगवान चव्हाण यांनी सरपंच यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले कामकाज करण्याची सूचना केली. तर रोहिदास मोरे यांनी पक्षात प्रवेश केलेल्या पार्वती पवार यांच्यामुळे आता नेरळ ग्रामपन्चायत मध्ये जी एक मताची अडचण यायची ती आता कायमची दूर झाली असून त्यांच्या माध्यमातून आपण आता मजबूत झालो असून पार्वती पवार यांना पूर्ण सन्मान राखला जाईल असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.त्यानंतर बोलताना सरपंच रावजी शिंगवा यांनी नेरळ ग्रामपन्चायत वर फडकलेला भगवा कधीही खाली येऊ नये असा आमचा प्रयत्न राहणार असून सर्व सदस्य यांना घेऊन आपण नेरळ शाखा कार्यालयात बसून जनता दरबार भरवणार असून त्या काळात जनतेच्या समस्या थेट समजून जनतेच्या त्यात्या अडचणी दूर करण्याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. त्यात जातानेच्या मनात घर निर्माण कारतण्याचे काम आम्ही सर्व करणार आहोत पण बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने निवडून येऊन देखील त्यांच्या जयंती निमित्त आयोजित तयारी बैठकीला अनेकांची उपस्थिती नाही हि खेदाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. मात्र नजीकच्या काळात आम्ही सर्व शाखा कार्यालयात एकत्र येऊन जनतेचे प्रश्न सोडवू असे आश्वासन रावजी शिंगवा यांनी दिले. 

 

 




 


फोटो ओळ 

नेरळ शिवसेना 

छाय ः गणेश पवार