डिव्हाइन सॉलिटेअर्स या राष्ट्रीय सॉलिटेअर ज्वेलरी स्पेशालिस्टने दाखल केली ई-कॉमर्स सुविधा 

डिव्हाइन सॉलिटेअर्स या राष्ट्रीय सॉलिटेअर ज्वेलरी स्पेशालिस्टने दाखल केली ई-कॉमर्स सुविधा 


मुंबई 15 जानेवारी 2020: डिव्हाइन सॉलिटेअर्स या भारतातील पहिल्या सॉलिटेअर ज्वेलरी ब्रँडने ग्राहकांना घरबसल्या सर्वोत्तम सॉलिटेअर उपलब्ध करण्याच्या हेतूने आपली पहिली ई-कॉमर्स सुविधा दाखल केली आहे. सॉलिटेअर श्रेणीमध्ये दशकाहून अधिक अनुभव असणारी डिव्हाइन सॉलिटेअर्स (www.divinesolitaires.com/shop) ही केवळ सॉलिटेअरच्या विक्रीसाठी असणारी एकमेव ऑनलाइन सुविधा आहे. अंगठी, कानातले, पेंडंट, नोझ पिन, ओव्हल ब्रेसलेट, टेनिस ब्रेसलेट, बांगड्या, नेकलेस व मंगळसूत्र अशी वैविध्यपूर्ण सॉलिटेअर ज्वेलरी ऑनलाइन उपलब्ध आहे.


लक्झरी व लाइफस्टाइल वस्तू ऑनलाइन खरेदी करण्याची मिलेनिअल व जेन-झेड यांची वाढती पसंती व प्राधान्य यामुळे बाजारातील हा ट्रेंड वाढतो आहे. ई-कॉमर्स पोर्टल सुरू करून डिव्हाइन सॉलिटेअर्स आता ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार आणि अपेक्षित किमतीनुसार सॉलिटेअर ज्वेलरी तयार करून घेण्याची, तसेच किंमत, कॅरेट, रंग, क्लॅरिटी व कट अशा निरनिराळ्या निकषांच्या आधारे सॉलिटेअरची निवड करण्याची सेवा देणार आहे. डिव्हाइन सॉलिटेअर्स साखरपुड्याची अंगठी, कॉकटेल रिंग व मेन्स कलेक्शन असा विविध लोकप्रिय श्रेणींमध्ये विशिष्ट कालावधीत नवनवीन आधुनिक डिझाइन समाविष्ट करणार आहे. 


वापरण्यास सोपा इंटरफेस असलेल्या या ऑनलाइन सुविधेमुळे 10,000 रुपये इतकी कमी किंमत ते 80,00,000 रुपयांपर्यंतचे डिव्हाइन सॉलिटेअर्स डायमंड व डिव्हाइन सॉलिटेअर्स ज्वेलरी आणि 25,000 रुपये ते 80,00,000 रुपयांपर्यंतची डिव्हाइन सॉलिटेअर्स ज्वेलरी देशातील सत्तावीस हजार पिनकोड्समध्ये उपलब्ध होणार आहे. 


“डिव्हाइन सॉलिटेअर्समध्ये आम्ही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि सॉलिटेअर खरेदीचा उत्तम अनुभव देण्यासाठी सातत्याने योग्य ते बदल करत असतो. ग्राहकांना आता गोल, प्रिन्सेस, आयताकृती व पिअर आकारातील 0.10 कॅरेट ते 2.99 कॅरेटमधील सॉलिटेअर निवडण्याची सेवा दिली जाणार आहे. आम्ही D ते K असे रंग आणि IF ते SI अशी क्लॅरिटी उपलब्ध करतो. या निकषांमुळे ग्राहकांना उत्कृष्ट व सर्वात सुंदर संपत्ती स्वतःची स्वतः खरेदी असल्याची खात्री मिळते. ग्लोबल ऑनलाइन ज्वेलरी मार्केट 2018-2022 अहवालाच्या मते, 2018-2022 या कालावधीमध्ये ग्लोबल ऑनलाइन ज्वेलरी 15.69% CAGR नुसार वाढत राहील, आणि सॉलिटेअरच्या बाबतीत आम्ही या वाढीतील मोठा हिस्सा मिळवू शकू, असा विश्वास आहे”, असे डिव्हाइन सॉलिटेअर्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक जिग्नेश मेहता यांनी सांगितले. 


 


देशभरातील सॉलिटेअरप्रेमींना आता कॅश ऑन डिलेव्हरी (निवडक उत्पादनांसाठी) हा पर्याय निवडून किंवा ऑनलाइन पैसे भरून डिव्हाइन सॉलिटेअर्सची निरनिराळी उत्पादने सहजपणे मिळवता येऊ शकतात. सर्वोत्तम गुणवत्ता व पारदर्शक प्रायसिंग यासाठी प्रसिद्ध असलेली डिव्हाइन सॉलिटेअर्स सुरुवातीला मुंबईतील काही ठिकाणी ‘ट्राय अॅट होम’ हा पर्यायही उपलब्ध करत आहे. 


2006 मध्ये स्थापन झाल्यापासून या ब्रँडने उल्लेखनीय नावीन्ये सादर केली आहेत, जसे 123 निकषांची गुणवत्तेची हमी, देशव्यापी मापदंड व पारदर्शक प्राइस लिस्ट, डिव्हाइन सॉलिटेअर्स मोबाइल अॅप्लिकेशन व सॉलिटेअर प्राइस इंडेक्स. डिव्हाइन सॉलिटेअर्स ग्राहकांना त्यांच्या सॉलिटेअर डायमंडवर सर्वोत्तम बाय बॅक पर्याय, खरेदीवर गुणवत्तेच्या खात्रीचे प्रमाणपत्र व डायमंडवर एक वर्षाचा मोफत विमाही देते. ब्रँडची भारतातील 82 शहरांत 160 स्टोअर्स आहेत, तसेच हा ब्रँड युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड व नेपाळ येथेही पोहोचला आहे.