छ.शिवाजी नगर येथून सुटणाऱ्या एस.टी बस, यापुढे जुना पुणे मुंबई हमरस्त्यावर खडकी भागात असणार्‍या बजाज उद्यानाजवळ हलवण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी.

*सर्वांना सुचित करण्यात येत आहे की....*दिं. ३१-१२-२०१९ पासून आपले नेहमीचे शिवाजीनगर एस टी बस स्टँड बंद झाले असून त्या स्थानकावरून सुटणार्‍या व तेथे येऊन थांबणार्‍या बस आजपासून तेथून सुटणारही नाहीत अथवा तेथे येणारही नाहीत.


या ऐवजी हे बस स्थानक तात्पुरते (अंदाजे ३ ते ५ वर्षासाठी ) जुना पुणे मुंबई हमरस्त्यावर खडकी भागात असणार्‍या बजाज उद्यानाजवळ हलवण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी.


या मुळे या स्थानकावर जाण्यासाठी व येथून येण्यासाठी पूर्वी पेक्षा जास्तीचा वेळ लागणार आहे. तरी त्या प्रमाणे वेळेचे नियोजन करावे. तसेच या स्थानकावर येण्या जाण्याचा खर्चही वाढणार आहे.


या स्थानकातून उत्तर महाराष्र्टात अहमदनगर अथवा नाशिक मार्गे जाणार्‍या व तिकडून येणार्‍या गाड्यांचा समावेश आहे. त्या शिवाय या ठिकाणाहून येऊन पुढे मुंबईकडे जाणार्‍या बसेस ही येथूनच सुटतात अथवा येतात. याच प्रमाणे कोकणातील रोहा, पाली, पेण व अलिबाग येथे जाणार्‍या गाड्याही येथूनच ये जा करतात.


थोड्याच दिवसात पुणे सिटी बसेसची (PMPL) डायरेक्ट या नविन स्थानकापासून ये जा सूरू होईल. परंतू त्याला अंदाजे पंधरा ते तीस दिवसांचा वेळ लागेल.


आत्ताचे जे शिवाजीनगर बस स्थानक आहे त्या ठिकाणी मेट्रो व एस टी बस स्थानक अशी एकत्र भव्य इमारत बांधण्याचे काम चालू असल्यामुळे हा तात्पुरता बदल केलेला आहे.


आपण योग्य ती काळजी घ्या व आपल्याकडे येणार्‍या पाहूण्यांना व नातेवाईकांना सुद्धा सांगा.