मानवमिलन संस्थेच्या महिला विभागाचा पदग्रहण समारंभ संपन्न 

मानवमिलन संस्थेच्या महिला विभागाचा पदग्रहण समारंभ संपन्न
रेंजहिल्स, ता. 8 - पुणे येथील मानवमिलन संस्थेच्या महिला विभागाचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न झाला.  मावळत्या अध्यक्षा साधना ललवानी यांनी नवनियुक्त अध्यक्षा श्रीमती निर्मला चंद्रकांत छाजेड यांना 2020 चे अध्यक्षपद सुपूर्द केले. यावेळी उपाध्यक्ष पदी श्रीमती पुष्पाबाई बोरा यांची निवड झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एकपात्री हास्य कलाकार मा. मकरंद टिल्लू, स्वाध्यायप्रेमी शकुंतला चोरडिया, कमल आव्हाड, खडकी शिक्षण संस्थेचे सचिव मा. आनंद छाजेड, वर्धमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. विलास राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. 
मानवमिलन संस्थेचे संस्थापक नेपाळकेसरी श्री मणिभद्रजी महाराज यांच्या प्रेरणेने 1998 मध्ये सुरू झालेल्या य  संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दरवर्षी वेगवेगळ्या महिलांना देऊन त्यांचा उत्साह वाढवला जातो. संस्थेच्या वतीने अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात  नवनिर्वाचित अध्यक्षांबरोबरच आजी-माजी अध्यक्षांचे आणि सभासदांचे पुणेरी पगडी व मोत्यांचा हार घालून सत्कार करण्यात आले. यावेळी मानवमिलन संस्थेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मळवली येथील अनाथ संस्थेच्या मदतीसाठी संस्थेच्या योगिता मूद यांना पस्तीस हजार रुपयांचे धान्य देण्यात आले. यात अकरा हजार रु.चे डोनेशन स्व. कमलाबाई ओसवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात आले. कॅन्सरवरील रोग्यांच्या मदतीसाठी पहचान संस्थेच्या वेदवती गोरे यांना एकतीस हजार रुपये देण्यात आले. याप्रसंगी प्रार्थना, अहवालवाचन, खजिनदार अहवाल, पुढील प्रकल्पांचे आयोजन-नियोजन चर्चा, जुन्या-नव्या अध्यक्षांचे भाषण झाले. संस्थेतर्फे 13 तारखेपासून आयोजित करण्यात येणार्‍या रक्तदान शिबिर, आरोेग्यशिबिर, मोतीबिंदू शिबिर, नेत्रतपासणी शिबिराची माहिती यावेळी देण्यात आली. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्रीमती निर्मला छाजेड यांनी सांगितले की खरी सेवा, खरे समाधान मानवमिलनमुळे मिळते. मानवमिलन सेवा हीच खरी ईश्‍वरसेवा आहे. म्हणूनच आपणही समाजाचे देणे लागतो, या विचाराने सर्वांनी जगले पाहिजे. हा आदर्श माझे पती स्व. चंद्रकांतजी छाजेड यांनी दिला, तोच वसा आणि वारसा घेऊन मी व माझी मुले-मुली शक्य तितकी समाजसेवा करीत असतो व पुढेही करीत राहू.
यावेळी पुढील वर्षभराच्या कार्यक्रमाची रूपरेषा राष्ट्रीय महामंत्री अ‍ॅड. ललिता ओसवाल यांनी मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रिजबाला श्रीश्रीमाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राखी राहुल छाजेड व अर्चना लुणावत यांनी केले. कार्यक्रमाची सांगता जैन गुरु महाराजांच्या मांगलिकाने झाली. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


 


 


 


 


 


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------ 


■★■★★■★◆★◆★◆★ 


 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......


बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी                    


*संपादक संतोष सागवेकर* 


*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*                   


*वर संपर्क साधावा* 



*साप्ताहिक पुणे प्रवाह*


*Youtube _  Facebook*  _ 


 *Instagram Twitter* 


*वर ही*


*आता पुणे प्रवाह*
.................. 


*वरील सर्व पेज लाईक* -



 *सबस्काईब करून*, 
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
 
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....* 


★★★★      


*सदैव  राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏