पू.श्री पारस गुरुदेव यांचे महा मांगलिक(स्तोत्र पठन व प्रवचन) संपन्न.

श्री चंपकगच्छनायकजी तपस्वीराज पू.श्री.पारस गुरुदेव यांचे महा मांगलिक(धार्मिक पठण व उपदेश)संपन्न.दादावाडी अहिंसा भवन येथे याचे आयोजन हितेंद्र सोमाणी परिवार व राजेश नहार परिवाराने केले होते.या प्रसंगी मार्गदर्शन करताना पू.श्री पारस गुरुदेव यांनी “माणूस  व सर्व प्रकारचे जीवजंतु यांचे कल्याण सर्वांवर प्रेम केल्याने होते.प्रेम हेच सर्व धर्मांचे मूळ आहे.हिंदुस्थानातील सर्व नागरिकानी एकमेकांत स्नेह व एकता वाढवावी देशाची उन्नती होईल असे प्रतिपादन केले.तसेच सर्वांना आशीर्वाद दिला.या कार्यक्रम प्रसंगी हितेंद्र सोमाणी,राजेश नहार आदि मान्यवरांच्या बरोबरच जैन धर्माच्या सर्व शाखांतील नागरिक उपस्थित होते.   


छायाचित्र :महा मांगलिक श्रवण करणारे भाविक.