हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संदीप गायकवाड(कसबा निरीक्षक)यांनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले.सारसबाग येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक संदीप गायकवाड,प्रमुख पाहुणे चित्रकार चारूहास पंडित,नगरसेवक विशाल धनवडे,उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे,लायन्सचे ला. अभय शास्त्री,हेमंत नाईक,ला.विद्या नेवे,ला आनंद आंबेकर,भरत चौधरी,आदि मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी बोलतांना चारूहास पंडित यांनी चित्रकलेच्या माध्यमातून फक्त  चित्रकारच घडत नाही तर सौन्दर्यदृस्टी घडते व यातून देशाच्या घडणीस मदत होते असे संगितले.संदीप गायकवाड यांनी उपक्रमाचे हे २५ वे वर्ष असल्याचे सांगून मुलामुलींना योग्य ते व्यासपीठ मिळावे हा हेतु असल्याचे संगितले.


छायाचित्र :मुलांची चित्रे पाहतांना मान्यवर