सुधारित प्रेस नोट
प्लॉगेथॉन नंतर स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत आयोजित स्वच्छता साखळी
मध्ये एकूण २,९०,६३३ विद्यार्थ्यी, शिक्षक व पालकांचा सहभाग.
शहराच्या स्वच्छतेचे महत्व केवळ नागरिकांपुरतेच मर्यादित न राहता त्याची
सुरुवात शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून होणे गरजेचे असल्याचे
मा.महापौर यांनी सांगितले व याचसाठी सर्व शालेय/महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांची मानवी साखळी बनवून स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांद्वारे
नागरिकांपर्यत पोहचवण्यासाठी दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी स्वच्छता
साखळी बनविण्याचे आवाहन मा.महापौर यांनी सर्व शाळा/महाविद्यालयांना केले.
सर्व शाळा/महाविद्यालयांमार्फत शाळेच्या परिसरात सर्व विद्यार्थी व
शिक्षक यांची मानवी साखळी बनवून, स्वच्छतेचा संदेश देत स्वच्छतेची शपथ
घेण्याबाबत नियोजन करण्यात आले. दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी सकाळ व
दुपार सत्रातील एकूण ८६१ शाळा, एकूण २७३४५१ शालेय विद्यार्थी, एकूण ९८४७
शिक्षक व एकूण ७३३५ पालक असे एकूण २,९०,६३३ सहभागी उपस्थित होते. यामध्ये
सर्व उपस्थित विद्यार्थी/शिक्षक यांनी मानवी साखळी बनवून, स्वच्छतेच्या
घोषणा दिल्या. तसेच आपले शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी नागरिक म्हणून
आपली काय जबाबदारी आहे याबाबत पोस्टर्स द्वारे जनजागृती केली गेली.
विद्यार्थ्यांच्या घोषणा ऐकुन आजूबाजूच्या नागरिकांनी याबाबत कुतूहलाने
विचारणा केली व त्यावर विद्यार्थ्यांनी नागरिकांना सार्वजनिक
स्वच्छतेबाबत माहिती दिली. शहरातील विविध शाळांमध्ये घेण्यात आलेल्या या
उपक्रमांत कोथरूड भागात मा.महापौर, श्री.मुरलीधर मोहोळ, घनकचरा
व्यवस्थापन विभाग प्रमुख, मा.श्री.ज्ञानेश्वर मोळक, शिक्षणाधिकारी,
श्री.दिपक माळी यांनी आपली उपस्थिती नोंदविली. तसेच मा.उपमहापौर, श्रीमती
सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष, श्री. हेमंत रासने, घनकचरा
व्यवस्थापन विभागाचे महापालिका सहाय्यक आयुक्त, श्री.माधव जगताप यांनी
टिळक रोड भागात व महापालिका आयुक्त, मा.श्री.सौरभ राव,अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी औंध भागात,
तसेच विविध स्थानिक मा.सभासद यांनी देखिल विविध शाळांमध्ये आपली उपस्थिती
नोंदविली.
अशा प्रकारे शहरातील एकूण ८६१ मनपा व खाजगी शाळा व एकूण २,९०,६३३
शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी स्वच्छता साखळीत आपला सहभाग
नोंदवून स्वच्छतेचा संदेश देत आपले शहर स्वच्छ व सुंदर राखण्याची शपथ
घेतली. दिनांक २८/१२/२०१९ रोजी संपूर्ण शहरभर घेतलेल्या “प्लॉगेथॉन २०२०
- मेगा ड्राईव्ह” मध्ये देखिल याच प्रमाणे मोठ्या संख्येने एकूण १०५४१७
पुणेकरांनी आपला सहभाग नोंदवून पुणे शहर स्वच्छ व सुंदर राखण्याची शपथ
घेतली होती. अशा प्रकारे हे दोनही उपक्रम मिळून एकूण ३,९६,०५० पुणेकरांनी
आपले शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
पुणेकर नागरिकांसमवेत शालेय विद्यार्थी देखिल आपले शहर स्वच्छ व सुंदर
ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने पुढाकार घेत असल्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण
२०२० मध्ये पुणे शहर नक्कीच प्रथम क्रमांक पटकावणार अशी आशा यावेळी
मा.महापौर यांनी व्यक्त केली.