इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन

इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये मुलांची नाविण्यपूर्ण घडवणं देवयानी मुँगली


 


इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन


 


पिंपरी चिंचवड - इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये मुलांचे भविष्य नाविण्यपूर्ण संकल्पनांनी साकारणारे आहे. विविध तंत्र पद्धतंच्या वापरातून विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम प्रकारे शिक्षण याठिकाणी मिळत असून त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी मिळतील, असे मत संस्कृती ग्रूप ऑफ स्कूलच्या संचालिका देवयानी मुँगली यांनी व्यक्त केले. पिंपरी–चिंचवड येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.


यावेळी, संस्थापक संचालिका कमला बिष्ट, डॉ. संजय सिंग, श्री. विकास साने, सौ. सपना साने, डॉ. अजित थिटे, प्रशांत पाटील, किरण गुंजाळ, प्रा. संदीप पवार, भास्कर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम वर्षाच्या स्नेहसंमलनात “अतुल्य भारत” या नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले.


मुँगली पुढे म्हणाल्या, वार्षिक स्नेहसंमेलन हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण असतो. याठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी शिस्तबद्ध आहेत, हे शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांवर किती मेहनत घेतात, यावरून लक्षात येते. सर्व विद्यार्थ्यांमध्ये असलेला गुणवत्ता पुर्ण शिक्षणाचा गुण त्यांना भविष्यात पुढे नेण्याचे काम करतो, असेही त्या म्हणाल्या.


स्कूलच्या संचालिका कमला बिष्ट यांनी शाळेची प्रगती तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेले विशेष प्राविण्य याची माहिती दिली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापनाने अनेक भौतिक सोयीसुविधा पुरविल्या आहेत. अजूनही अनेक नवनवीन विद्यार्थी उपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. प्रसंगी, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणीजन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य, गायन, छोट्या छोट्या नकला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रेक्षकांच्या उत्साही प्रतिसादाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.


प्रमुख पाहुण्यांचे व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रेक्षकांकडून भरभरून टाळ्यांच्या साथीने अभिनंदन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शक कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देबोश्री भोंडवे, जिटा रॉडिक्स, दिप्ती जैसवाल यांनी केले. कलाशिक्षीका दिशा कन्सारा, जिटा गोन्साल्विस यांनी संयोजन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्कूलचे सर्व शिक्षक- शिक्षीकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.