उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा


मुंबई, दि. 25  : भारतीय प्रजासत्ताकाच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 


उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, राज्य आणि राष्ट्र उभारणीत शेतकरी, कष्टकरी जनतेचं, सैनिकांचं, देशातल्या प्रत्येकाचं योगदान आहे. त्यांचं तसंच देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण यानिमित्ताने केले पाहिजे. महाराष्ट्राने नेहमीच देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. भारताची लोकशाही बळकट करण्यात महाराष्ट्राचं मोलाचं योगदान आहे. ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवल त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याचा संकल्प आपण करूया.. 
केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपती पोलिस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरीसेवा दल पदक आदींची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील 54 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जीवन रक्षा पदकासाठी पाच जणांचा आणि अग्निशमन सेवा पदकासाठी सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यांचंही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे. तसेच महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते,राष्ट्रीय वीरता पुरस्कार विजेत्या बालकांचही उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केलं आहे.
oooo