स्वराज्यसंकल्पक महाबली शहाजीराजे भोसले स्मृतिदिन..
(२३ जानेवारी १६६४ होदेगिरी, कर्नाटक)
स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांचा आज स्मृतिदिन !!
स्वराज संकल्पिले मनी...
स्वतंत्र केली धरणी...
शहाजी राजांची नांगरणी ..
जिजाऊ साहेबांची विचारपेरणी...
शिवबांची स्वराज्य उभारणी ..
शंभूराजेंनी केले लोक स्वाभिमानी.....
हीच असे शहाजी राजांची महान लोक करणी.....
महान पिता,थोर प्रशासक, स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांना विनम्र अभिवादन
रयतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शहाजीराजे नेहमी तत्पर असत. होदेगिरीच्या जंगलातील नरभक्षक वाघांचा रयतेला त्रास होत असल्याची खबर त्यांच्या कानावर येताच त्यांनी वाघांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला. शहाजीराजे जंगलात वाघाच्या शिकारीला गेले. अशाच एका नरभक्षक वाघाचा पाठलाग करताना वेगात असणाऱ्या त्यांच्या घोड्याचा अचानक दुर्दैवी अपघात झाला आणि शहाजीराजे घोड्यावरुन कोसळले. या अपघातात त्यांचे निधन झाले. रणांगण गाजवणारा लढवय्या वयाच्या सत्तरीत रयतेचे प्रश्न सोडवत असताना मरण पावला. कर्नाटकातील होदेगिरी जंगलात त्यांचे स्मारक आहे.
विनम्र अभिवादन !