९वा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार ’ प्रदान समारंभ.

९वा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार ’ प्रदान समारंभ.

सप्रेम नमस्कार,
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह व भारत अस्मिता फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे ९वा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान समारंभ बुधवार दि.८ जानेवारी २०२० रोजी सायं. ५ वाजता, संत श्री ज्ञानेश्‍वर सभागृह, एमआयटी डब्ल्यूपीयू, कोथरूड, पुणे येथे  होणार आहे.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगत सिंह कोश्यारी हे उपस्थित राहणार आहेत. तसेच, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सुप्रसिध्द संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड हे असणार आहेत.
नाशिक, पळसे येथील श्री. विष्णुपंत केरू गायखे (कृषिरत्न), लातूर येथील श्रीमती कुशावर्ता चंद्रशेखर बेळे (समाजरत्न), पुणे जिल्ह्यातील नारायणगाव  येथील डॉ.संदीप मनोहर डोळे (आरोग्यरत्न), उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील श्री.सुधीर बाळासाहेब खाडे (शिक्षणरत्न), पुणे येथील ऋचा राहुल धोपेश्‍वर (क्रीडारत्न), अमरावती जिल्ह्यातील खिरगव्हाण समशेरपूर गावाचे  सरपंच पुरूषोत्तम अंबादास घोगरे (ग्रामरत्न), धुळे येथील सौ. पुजा नितीन खडसे (बचतगटरत्न), लातूर येथील श्री. जयप्रकाश आसाराम दगडे (जनजागरणरत्न) व सोलापूर येथील ह.भ.प. श्री. सुधाकर महाराज इंगळे (अध्यात्मरत्न) यांना हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.