प्रसिद्ध चित्रकार घनश्याम देशमुख यांनी वेगवेगळ्या विषयांवर चितारलेल्या निवडक ३०० हास्यचित्रांचे प्रदर्शन दि.१२ ते १४ जानेवारी

 


पुणे, १२ जानेवारी- २०२०


प्रसिद्ध चित्रकार घनश्याम देशमुख यांनी वेगवेगळ्या विषयांवर चितारलेल्या निवडक ३०० हास्यचित्रांचे
प्रदर्शन दि.१२ ते १४ जानेवारी दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील कलादालनात पाहण्याची
संधी चित्ररसिकांना मिळणार आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन रविवार दि.१२ रोजी सकाळी ११ वाजता
मा.श्री.प्रमोदजी कांबळे (सुप्रसिद्ध शिल्पकार व चित्रकार) यांच्या हस्ते होणार आहे.
गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ आपल्या चित्रांची वैविध्यता जपणारे घनश्याम देशमुख यांनी
आतापर्यंत हजारो हास्यचित्रे रेखाटली असून, कमीत कमी रेषा, भरपूर आशय, रंग माध्यम आणि
रंगसंगतीची विविधता ही त्यांच्या हास्यचित्रांचे खास वैशिष्ट्ये आहेत.
सोमवार दि.१३ रोजी चित्रकार/व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख १२ ते दुपारी ३
या वेळेत रसीकांसमोर सामाजिक प्रबोधन करणारे व्यंगचित्र रेखाटणार आहे.


सोमवार दि.१३ मंगळवार दि.१४ रोजी चित्रकलेची आवड असलेले छोट्या विद्यार्थ्यांसाठी याच
कलादालनात 'रेषा माझ्या, रंग तुमचे हा कार्यक्रम आयोजित केला आहे.त्यावेळी चित्रकाराने
रेखाटलेले चित्रे मुलांना दिले जाईल व चित्र कसे रंगवायचे याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.यासाठी
मुलांना चित्रकलेचे साहित्य रंग, ब्रश, पेन्सिल,कागद उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना
प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सन्मानही करण्यात येईल.


घनश्याम देशमुख यांचे हे चवदावे प्रदर्शन आहे.विनामूल्य असणाऱ्या या प्रदर्शनात चित्रकला व
अॅनिमेशन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी निमंत्रित मान्यवर व्यंगत्रिकार 'व्यंगचित्र व प्रसारमाध्यम' या
विषयावर प्रात्यक्षिके देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. तसेच 'इलस्ट्रेशन व रंगमाध्यम' या विषयावर
चित्रकार मार्गदर्शन करतील.
तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन विनामुल्य असून आपण या प्रदर्शनाला आपण आवश्य भेट द्यावी.


मा. संपादक ....


कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकामधून 'सांस्कृतिक सदरात
किंवा स्वतंत्र बातमी म्हणून तसेच १२ जानेवारी रोजी स्थानिक/दैनंदिनी कार्यक्रमात
प्रसिद्ध करावे ही विनंती.


कळावे, आपला
घनश्याम देशमुख
संपर्क