ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन वाढीने पृथ्वी संकटात  , कमी उर्जा वापराच्या जीवनशैलीकडे चला ! : डॉ. प्रियदर्शिनी कर्वे

प्रेस नोट


ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन वाढीने पृथ्वी संकटात  , कमी उर्जा वापराच्या जीवनशैलीकडे चला ! : डॉ. प्रियदर्शिनी कर्वे
.......................................
'कार्बन अकाउंटिंग आणि ग्रीन इकॉनॉमिक्स'कार्यशाळेत पर्यावरण संवर्धनावर चर्चा


पुणे ः


'वार्षिक वापरातून प्रतिमाणशी २ टन कार्बन डायॉक्साईड उत्सर्जन ही जागतिक मर्यादा आपण ठरवून घेतली आहे. मात्र,प्रमाण आताच दुपटीहून अधिक आहे. भारतातदेखील उत्सर्जनाच्या लक्ष्मणरेषेचे उल्लंघन झालेले आहे.विकसित देशांवर अधिक जबाबदारी आहे. ग्रीन हाऊस उत्सर्जन कमी केले पाहिजे. त्यासाठी इंधन , उर्जा वापर कमी करुन जीवनशैलीच बदलायला  हवी. उर्जेचा वैयक्तिक वापर, इमारतीमधील वापर, उद्योगांतील वापर, दैनंदिन वापरातील गोष्टी -खरेदी या सर्वातून  पर्यावरणास हानीकारक ठरणाऱ्या वायूंचे उत्सर्जन कमी होणे गरजेचे आहे. ' लो कार्बन कंपनी ' असे ब्रॅंडिंग कंपन्यांनी करावे असा पर्यावरण संवर्धनाचा आग्रह आपण धरला पाहिजे', असे प्रतिपादन 'समुचित एन्व्हायरोटेक '  संचालक डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांनी केले. 


महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित 'कार्बन अकाऊंटिंग आणि ग्रीन इकॉनॉमिक्स ' या विषयावरिल राज्यस्तरीय  दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले होते.


 कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. कर्वे ' कार्बन अकांऊंटिंग' या विषयावर  बोलत होत्या. 


ही कार्यशाळा संस्थेच्या हाय टेक हॉल येथे २४ आणि २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली . 


महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ शैला बुटवाला,पर्यावरणशास्त्र विषयाच्या विभाग प्रमुख विजयालक्ष्मी शिंदे, डॉ गौरी देवस्थळे , डॉ. भूषण पाचपांडे यावेळी उपस्थित होते.


डॉ. कर्वे म्हणाल्या, 'कार्बन उत्सर्जन वाढते आहे. पृथ्वीचे सर्वसाधारण तापमान वाढत आहे. वीज, कोळसा, इंधन वापराने हे उत्सर्जन वाढते आहे. समुद्राचे तापमान वाढल्याने पाणी प्रसरण पावून किनारे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मालदीव सारखे बेटांचे देश २० वर्षांनी पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. हवामानात टोकाचे बदल होत आहेत. भारतात किनाऱ्यांना आणि हिमालयाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या प्रदेशांना हवामान बदलाचा फटका बसणार आहे. एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोकसंख्येला पूर, दुष्काळ याचा फटका बसणार आहे.



विकसित देशानी इतर देशात पर्यावरणस्नेही उर्जा प्रकल्प राबवून ' कार्बन क्रेडीट ' मिळवण्याची संकल्पना मागे पडत आहे.उद्योगानी कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण करण्यावर भर देऊन ' कार्बन अकांऊंटिंग ' च्या प्रक्रियेत आले पाहिजे. कार्बन अकाऊंटिंग कडे करीयर म्हणून विद्यार्थ्यांनी पाहावे, असा सल्लाही डॉ. कर्वे यांनी दिला.


इथून पुढे शेतीचे पॅटर्न बदलावे लागणार आहेत, अन्नधान्य , फूड पॅटर्न , खाण्याच्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. पुणे पीएमआरडिए  स्तरावर अनुकुल बदल व्हावे, यासाठी स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिक एकत्र येऊन प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


................................................