नवलेखक अनुदान योजनेचा लाभ घ्या...* *महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची योजना* *अर्ज करायचा अखेरचा दिनांक - २८ फेब्रुवारी २०२०*

*नवलेखक अनुदान योजनेचा लाभ घ्या...*
*महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची योजना*


*अर्ज करायचा अखेरचा दिनांक - २८ फेब्रुवारी २०२०*


सर्वांच्या माहितीसाठी विश्व मराठी परिषदेकडून महत्वपूर्ण संदेश... आपण वाचा आणि शेअर करा...


महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून सन २०२० या वर्षासाठी ज्याचे *आजमितीपर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही* अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.


नवलेखकांना,
(१) *कविता* (६४ ते ९६ टाईप केलेली पृष्ठे - ८० कविता) 
(२) *कथा* (१२८ ते १४४ टाईप केलेली पृष्ठे - जास्तीतजास्त ४५००० शब्द) 
(३) *नाटक/ एकांकिका* (६४ ते ९६ टाईप केलेली पृष्ठे - जास्तीतजास्त २८००० शब्द)
(४) *कादंबरी* (१२८ ते १४४ टाईप केलेली पृष्ठ - जास्तीतजास्त ४५००० शब्द)
(५) *बालवाड्.मय* (६४ ते ९६ टाईप केलेली पृष्ठे - जास्तीतजास्त २८००० शब्द)
(६) *वैचारिक लेख/ ललित लेख/ चरित्र/आत्मकथा/प्रवास वर्णन* (१२८ ते १४४ टाईप केलेली पृष्ठे  - जास्तीतजास्त ४५००० शब्द) 
या सहा वाङ्मय प्रकारातील पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी वरील पृष्ठसंख्येच्या मर्यादेतील मुद्रित (टाईप) मजकूराला अनुदान देण्यात येईल. _(वर उल्लेखिलेल्या किमान पृष्ठसंख्येपेक्षा कमी पृष्ठसंख्येचे तसेच कमाल पृष्ठसंख्येपेक्षा जास्त पृष्ठसंख्येचे मुद्रित पाठविल्यास सदर मुद्रिताचा या योजनेत विचार केला जाणार नाही)_


नवलेखकांनी आपले अप्रकाशित साहित्य मुद्रित स्वरूपात (टाईप केलेल्या) पाठवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे.


नवलेखकांनी त्यांचे साहित्य दिनांक *२७ जानेवारी, २०२० ते २८ फेब्रुवारी, २०२०* या कालावधीत पुढील पत्त्यावर पाठवावे.


*✉पत्ता:*
सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई ४०००२५. दूरध्वनी :- ०२२ २४३२५९३१


या योजनेसाठीचे माहितीपत्रक, विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर तपशील शासनाच्या *www.maharashtra.gov.in* या संकेतस्थळावर 'नविनतम संदेश' या अंतर्गत नवलेखक अनुदान योजना २०२० माहितीपत्रक व अर्ज या शीर्षकाखाली तसेच What's New या अंतर्गत Navlekhaka Grant Scheme Rules Book and Application Form या शिर्षकाखाली तसेच मंडळाच्या *https://sahitya.marathi.gov.in* या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


🔸 संदेश सौजन्य:
*विश्व मराठी परिषद*
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विषयी अत्यंत उपयुक्त माहिती देणारे, सहकार्य आणि मार्गदर्शन करणारे महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र आणि विदेशातील मराठी बांधवांचे आणि युवकांचे आत्मीय व्यासपीठ...!


👉कृपया संकेतस्थळाला भेट द्या  आणि सबस्क्राईब करा.
*www.vishwamarathiparishad.org*


👉विश्व मराठी परिषदच्या व्हॉट्सअप लिस्ट मध्ये सहभागी व्हा आणि भाषा, साहित्य, संस्कृती विषयक उपयुक्त माहितीचे अपडेटस मिळवत रहा. त्यासाठी *७०६६२५१२६२* हा क्रमांक *विश्व मराठी परिषद* या नावाने सेव्ह करून त्यावर आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरुन *Join Vishwa Marathi Parishad* असा संदेश पाठवा.


👉फेसबुक पेज लाईक करा :
*https://www.facebook.com/vmparishad*