क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे,दि.3- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण यांनीही अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
००००
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रशासनातर्फे अभिवादन