त्यांच्या' मुळे चिमुकली पोहचली सुखरूप !

'त्यांच्या' मुळे चिमुकली पोहचली सुखरूप !



पुणे : शनिवारची सकाळ ... एक पाच वर्षाची चिमुकली घरापासून खेळता खेळता रस्ता चुकते आणि ती भरकटते. रडवेला चेहरा आणि घाबरलेली ती चिमुरडी पाहताच मुमताज शेख या आस्थेने तिला जवळ घेतात आणि  थेट स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी आणि नगरसेविका सौ. सुजाता सदानंद शेट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहचतात, तेथून लागलीच आई - वडिलांचा  शोध घेतला जातो  आणि चिमुरडी सुखरूपपणे पालकांकडे पोहचते. 


 स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी आणि नगरसेविका सौ. सुजाता सदानंद शेट्टी यांच्या सक्रिय कार्यकर्त्या असलेल्या  मुमताज शेख या शनिवारी मंगळवार पेठेत असताना त्यांना एक घाबरलेली चिमुरडी दिसून आली. रस्ता चुकल्याचे तात्काळ निदर्शनास आल्याने शेख यांनी त्या मुलीला जवळ घेत विचारपूस सुरु केली मात्र संजना या नावाव्यतिरिक्त तिला काही सांगता येत नव्हते. मुमताज शेख यांनी मुलीला घेऊन  स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी आणि नगरसेविका सौ. सुजाता सदानंद शेट्टी यांचे  जनसंपर्क कार्यालय गाठले आणि तेथून कार्यकर्त्यांनी शोध मोहीम सुरु केली. त्यानंतर कमला नेहरू रुग्णालयांमागे त्या मुलीचे घर असल्याचे समजल्यानंतर तिच्या आई -वडिलांना कार्यालयावर आणण्यात आले आणि खातरजमा करून मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.  यावेळी  स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी हेही उपस्थित होते.