कोपरगाव तहसील कार्यालयात आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्व रेशन दुकानदार व पुरवठा विभागाची बैठक घेतली.*

*कोपरगाव तहसील कार्यालयात आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्व रेशन दुकानदार व पुरवठा विभागाची बैठक घेतली.*


यावेळी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजने अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना रेशनकार्डच्या (शिधापत्रिका) माध्यमातून अन्न-धान्य मिळालेच पाहिजे. ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड नाही अशा नागरिकांचा सर्वे करून त्यांच्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करा. एकही लाभार्थी अन्न-धान्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांनी पुरवठा विभागाला केल्या. तसेच शासकीय पातळीवर पुरवठा विभागाला येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडवू असे आश्वासन दिले.


या बैठकीला तहसीलदार योगेश चंद्रे, पंचायत समिती सभापती सौ. पोर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक मंदार पहाडे, सुनील शिलेदार, अजीज शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले, राहुल जगधने आदी मान्यवरांसह, रेशन दुकानदार व पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.