तालमयी अनोखी मैफल...

तालमयी अनोखी मैफल...


 


गायन वादन यांना एकत्रितपणे संगीत म्हटले जाते.  पुण्यात मधुमती संगीत विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.  ख्यातनाम तबला वादक तालभूषण पं नचिकेत मेहेंदळे यांच्या ५० विद्यार्थ्यांनी एकल, स्वतंत्र शास्त्रोक्त तबला वादन सादर केले.त्यात गंधार जोशी याने त्रितालात वादन करून सर्वांना जागीच खिळवले, ओंकार जोशी ,सुमेध पाथ्रुडकर, सार्थक चव्हाण यांनी तीनतालात एकल वादन केले, तसेच रूषभ खळदकर यानेही त्रितालात वादन केले, तसेच सिद्धेश्वर साठे याने १५ मात्रांच्या पंचम सवारी तालात स्वतंत्र तबला वादन करून सर्वांना जागीच खिळवून ठेवले, तसेच एकतालात सिद्धार्थ कुंभोजकर याने वादन करून पसायदानाने मैफलीची सांगता झाली.


 


यावेळी तन्मयी मेहेंदळे -  देशपांडे यांचे गायनही झाले अवघे गरजे पंढरपूर, जय शारदे वागीश्वरी आदि गाण्यांनी मैफलीला रंगत आणली निवेदन निवेदिता मेहेंदळे यांनी केले तर संवादिनी साथ देवेंद्र पटवर्धन यांची लाभली तर प्रमुख उपस्थिती दयानंद घोटकर, प्राची घोटकर व पं. विजय दास्ताने यांची होती.


 


फोटो अोळ :- मधुमती संगीत विद्यालयातील विद्यार्थी संगीत मैफलीच्या वेळी प्रमुख पाहुणे पं.विजय दास्ताने आणि गायक दयानंद घोटकर यांच्या समवेत, संचालक नचिकेत मेहेंदळे, निवेदिता मेहेंदळे, प्राची घोटकर आणि तन्मयी रोहन देशपांडे.