आरडे येथील ओहोळावर बांधलेला सिमेंट बंधारा बहू उपयोगी
आरडे येथील ओहोळावर बांधलेला सिमेंट बंधारा बहू उपयोगी

कर्जत,दि .19 गणेश पवार

              कर्जत तालुक्यातील आरडे गावाच्या मागील बाजूने डोंगरातून पाणी वाहून नेणाऱ्या ओहोळाचे पाणी अडविण्याचा प्रयत्न दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने केला.मात्र त्या नाल्यावर बांधलेला सिमेंट बंधारा स्थानिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून अनेक कारणांनी हा सिमेंट बंधारा मदतीला आला आहे.

                  कर्जत तालुक्यातील आरडे हे गाव कळंब-पाषाणे-वांगणी रस्त्यावर आहे.त्या गावच्या मागे मोठ्या प्रमाणात जंगल असून तो परिसर उंचसखल आहे.त्यामुळे त्या भागातून एक मोठा ओहोळ पावसाळ्यात वाहत असतो.त्या ओहोळाचे पाणी हे पावसाळ्यात तेथे असलेल्या उतार भागामुळे न थांबता वाहत जात असते.त्यामुळे पावसाळा संपला की काही दिवसातच त्या ओहोळात पाण्याचा खडखडाट असतो.त्यामुळे उन्हाळ्यात ओहोळाचे पात्र जे सतत रुक्ष असायचे.त्यामुळे त्या ओहोळावर सिमेंट बंधारा बांधावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती.त्यामुळे 2016 मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने पाणी अडविण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार त्या ओहोळावर पाणी साठवण बंधारा बांधण्यात आला आणि 2017 मध्ये प्रथम त्या साठवण बंधाऱ्यात पाणी साठले गेले होते.मात्र बंधाऱ्यातील पाणी किती दिवस साचून राहणार याची खात्री नसल्याने शेतकरी यांनी शेती केली नव्हती.परंतु सिमेंट बंधाऱ्याचे काम मजबूत झाल्याने सिमेंट बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहू लागले असून एप्रिल महिन्यापर्यंत बंधाऱ्यामुळे पाणी दिसून येत असते. बंधाऱ्यातील साठवण क्षमता चांगली असल्याने त्याचा फायदा स्थानिक शेतकरी आता उचलू लागले आहेत.

                    त्या पाणी साठवण बंधाऱ्यामुळे आरडे गावाच्या परिसरातील जमिनीची भूजल पातळी वाढली आहे.त्या ठिकाणी शेतकरी भाजीपाला आणि अन्य प्रकारचे व्यवसाय त्या पाण्यामुळे करू लागले आहेत.सिमेंट बंधाऱ्यामुळे आता त्या भागात मोठया प्रमाणात पाणी साठा दिसत आहे.तर त्या पाण्यामुळे त्या ओहोळातील सिमेंट बंधाऱ्याखालील भाग देखील पाणीदार झालेला दिसून येत आहे.त्या सर्व पाण्यामुळे आरडे भागातील शेतकरी हे खुश झाले असून बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग सर्व शेतकरी आणि लहान उद्योजक करताना दिसत आहेत.

 

 

 

 

उत्तम शेळके-जेष्ठ ग्रामस्थ,आरडे

सिमेंट बंधारा झाल्याने आमचा भाग जो उन्हाळ्यात कोरडा टणक असायचा तो आता पाणीमय दिसून येत आहे. त्याचवेळी या पाण्याचा उपयोग आमचे शेतकरी करीत असून आमच्यासाठी हा बंधारा फायद्याचा ठरला आहे.

 

 

 

 

 

 

 

आर डी कांबळे-उपअभियंता, जिल्हा परिषद

आमच्या विभागाकडून बहुतेक सर्व ठिकाणी बांधलेले सिमेंट बंधारे यांचे बांधकाम चांगले झाले आहे.त्यामुळे बंधाऱ्यात चांगल्या प्रकारे पाणीसाठा होत असून त्याचा फायदा शेतकरी घेत आहेत.त्यामुळे सिमेंट बंधारे बांधण्याचा जिल्हा परिषदेचा हा प्रयत्न शेतकरी वर्गासाठी आणि जमिनीची भूजल क्षमता वाढविण्यास मदतीचा ठरत आहे.

 

 

 

 

 

 

फोटो ओळ 

आरडे येथील ओहोळावर बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा

छाय ः गणेश पवार