अन्नपदार्थांसाठी नॉन-थर्मल एचपीपी तंत्रज्ञान वापरणारी पहिली भारतीय कंपनी, न्युटीने दाखल केले वाढीव शेल्फ-लाइफ, रेडी-टू-इट करी व मील

अन्नपदार्थांसाठी नॉन-थर्मल एचपीपी तंत्रज्ञान वापरणारी पहिली भारतीय कंपनी,


न्युटीने दाखल केले वाढीव शेल्फ-लाइफ, रेडी-टू-इट करी व मील


 


न्युटीचे प्रोप्रायटरी एचपीपी प्रिझर्व्हेशन तंत्रज्ञान अन्नपदार्थ ठेवते ताजे, आरोग्यदायी व सुरक्षित 


 


मुंबई, 14 जानेवारी 2020: एचपीपी (हाय-प्रेशर प्रोसेसिंग) तंत्रज्ञानाची मदत असणाऱ्या प्रोप्रायटरी कूकिंग प्रक्रियेद्वारे नॉन-थर्मल कोल्ड पाश्चरायझेशनच्या वापराने वाढीव शेल्फ-लाइफ, रेडी-टू-इट करी व मील्स दाखल करणारी न्युटी ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. न्युटी ही आरोग्यदायी, समाधानकारक व किफायतशीर अन्नपदार्थांचे पर्याय उपलब्ध करण्यासाठी आधुनिक अन्नपदार्थ तंत्रज्ञान, प्रक्रिया व लॉजिस्टिक्स वापरणारी भारतातील पहिली ओम्नी-चॅनल फूड-अॅज-ए-सर्व्हिस कंपनीही आहे. अस्सल चवीचे प्रादेशिक खाद्यपदार्थ देऊन प्रत्येकाची भूक शमवणे, अपव्यय टाळणे आणि मायक्रो फूड-आंत्रप्रिन्युअर्सच्या निर्मितीद्वारे रोजगारात वाढ करणे, हे न्युटीचे उद्दिष्ट आहे. ट्युलिटी आहारा प्रा. लि.चे व्हेंचर असणाऱ्या न्युटीचा हाय-टेक एचपीपी मील कारखाना होसुर येथे आहे व त्याची दररोज 5 टन मील प्रक्रिया क्षमता आहे. कंपनीने सुविधा निर्माण करण्यासाठी व आपले जाळे तयार करण्यासाठी आतापर्यंत 5 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. 


 


अगोदरच्या व्हेंचर्समधून यशस्वीपणे बाहेर पडलेले उद्योजक व न्युटीचे सह-संस्थापक रे नाथन यांनी सांगितले, "खाद्यपदार्थ ही मानवाची अत्यंत मूलभूत गरज आहे. अनेकदा शहरातील मिलेनिअल्सना अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने चव, आरोग्य किंवा पैसे या बाबतीत दररोज तडजोड करावी लागते. संतुलित आहार ही मनुष्याची मूलभूत गरज आहे आणि त्यामुळे आम्ही किफायतशीर, पोषक, चवदार व आरोग्यदायी असणाऱ्या आणि अधिक शेल्फ-लाइफ असणाऱ्या रेडी-टू-इट मीलवर भर देतो. गुणवत्ता व किंमत यांची खात्री करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांकडून माल घेतो. पाककृती अस्सल प्रादेशिक असतील, याबाबत आम्ही जागरुक असतो. तसेच, कोणत्याही कृत्रिम घटकांचा समावेश न करता, आमच्या प्रोप्रायटरी एचपीपी तंत्रज्ञानाद्वारे आमच्या मीलना 60 दिवसांपर्यंत शेल्फ-लाइफ मिळते."


 


न्युटीचे सह-संस्थापक नवीन चंदर म्हणाले, "आमच्या नव्या करी उत्पादनांमध्ये 30 पर्याय असून कोणत्याही व्यक्तीला किंवा फूड-आंत्रप्रिन्युअरना कमीत कमी त्रासात व गुंतवणुकीत अन्नपदार्थांचे वैविध्य वाढवता येईल. आम्हाला भारताचे किचन व्हायचे आहे. 2023 पर्यंत आम्ही 500 शहरांमध्ये पोहोचणार आहोतत आणि तेव्हापर्यंत आम्ही 200,000 मायक्रो फूड-आंत्रप्रिन्युअर्स निर्माण केलेले असतील. भारतातील नव्या पिढीच्या खाण्याच्या सवयी झपाट्याने बदलत आहेत, किचनमध्ये घालवला जाणारा वेळ कमी होत आहे आणि कामानिमित्त होणाऱ्या स्थलांतरामुळे आपल्या आवडीचे पदार्थ उपलब्ध होत नाहीत. रेडी-टू-इट मीलमध्ये आजवर अशक्य वाटणारे मिश्रण आता न्युटीमुळे खरेच आवाक्यात आले आहे." 


 


“आम्ही झपाट्याने विस्तार करत आहोत आणि 2020 अखेरीपर्यंत भारतातील प्रमुख 50 शहरांचा समावेश करण्याची आमची अपेक्षा आहे. 2023 पर्यंत, आम्ही कोणत्याही ग्राहकाच्या दोन किलोमीटर कक्षेमध्ये राहू शकू, अशी अपेक्षा असून, त्यासाठी मोठ्या शहरांत 1000 हून अधिक पॉइंट्स-ऑफ-सेल (पीओएस), मध्यम शहरांत 300 ते 500 पीओएस आणि लहान शहरांत 100 पीओएस आहेत. आम्ही पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत बिग बास्केट व अॅमेझॉन यासारख्या डिलेव्हरी अॅपद्वारे आणि 2020च्या मध्यापर्यंत अन्य हायपर-लोकल डिलेव्हरी अॅपद्वारे आम्ही सेवा उपलब्ध करणार आहोत. लवकरच सर्वांना गरजेनुसार आरोग्यदायी, पोषक व चवदार न्युटी मीलचा आनंद घेता येणार आहे,” असे न्युटीचे सेल्स व मार्केटिंगचे ग्रुप व्हीपी नितीन भट्ट यांनी सांगितले.