खिडकी असते आठवणींचे कवाड,क्षणिक विसावा, गतकाळाची साक्षी आणि भविष्याचा वेध घेणारी सुंदर नक्षी

*खिडकी* 
 🙄😲😱🤨😆


खिडकी असते आठवणींचे कवाड,क्षणिक विसावा, गतकाळाची साक्षी आणि भविष्याचा वेध घेणारी सुंदर नक्षी  !
खिडकी असते प्रकाश वा-याची वाट,कधी बंद कधी खुली, एखाद्याच्या मनासारखी आशेची पहाट  ! 
खिडकी असते वास्तूशैली,घराचा कवडसा आणि मनमोहक सुरक्षेची स्वच्छ॔दी पाऊलवाट  !
खिडकी गणिकेची लक्ष्मी, प्रतीक्षेची काळीजमाया, आशानिराशेचा झाकोळ आणि आयूष्याचा वणवा  ! 
खुली कवाडे जिंदादिल,बंद कवाडे परंपरेची, कधी अनाठायी वादळाच्या भीतीची, कटू आठवणींच्या घोटाची  ! 
दार कधी बंद असले तरी खिडकीची उघडीप चालू असते,मनकवडा वारा, इथेच वादळ होतो  ! 
साचून रहातात जळमटे, एखाद्या खिडकीत,भणाणून जातात,मुक्त वा-याच्या प्रतीक्षेत ,अगदी मनासारखी  ! 
अंतर्मनाच्या या खिडकीत,कधीतरी डोकवावे, व्यवहारी दुनियेत, तो असतो लेखाजोखा, एखाद्याच्या आयूष्याचा  !
    *आनंद सराफ*