महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई विविध कल्याणकारी योजना 

शंकर भाऊ तडाखे 


महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई विविध कल्याणकारी योजना 
-------******************----------
🧔🙎‍♂️बांधकाम कामगार कोणाला म्हणावे 👇🏻
इमारतिच्या सुरवाती खुदाइ काम करन्या पासून इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे जे कामगार काम करतात त्यांना बांधकाम कामगार म्हणतात त्यांना नोंदणी करता येते व योजनानचा लाभ घेता येतो. 
उदा. 1) खुदाइ कामगार 
        2) सेंट्रिंग कामगार 
        3) गवंडी कामगार 
        4) फरशी /  इलेक्ट्रिकल ( फिटिंग )
        5) पेंटिंग कामगार
        6) फर्निचर. सुतार कामगार
        7) फॅब्रिकेटर्स, 
        8) प्लंबर
        9) वीट भट्टी कामगार
        10) व इतर
                   
1) नोंदीत लाभार्थी  स्त्री बांधकाम कामगारास तसेच नोंदीत पुरुष लाभार्थी बांधकाम कामगाराच्या पत्नीस दोन जीवित अपत्या पर्यंत नैसर्गिक प्रसूतीसाठी रु, 15, 000/-व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु, 20, 000/-एवढे आर्थिक सहाय्य
2)नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या प्रति शैक्षणिक वर्षी शाळेतील किमान 75%किंवा अधिक उपस्थिती असणाऱ्या दोन पाल्यास इयत्ता 1 ते 7 वी साठी प्रतिवर्षी रु, 2500/-किंवा किंवा 8 वी ते 10 वी साठी प्रतिवर्षी रु, 5000/-एवढे शैक्षणिक आर्थिक सहाय्य. 
3)नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या 2 पाल्याना इयत्ता 10  वी व इयत्ता 12 वी मध्ये किमान 50%  किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु, 10, 000/- एवढे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य. 
4)नोंदीत लाभार्थी कामगाराच्या 2 पाल्याना इयत्ता 11 वी व 12 वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रु, 10, 000/-एवढे शैक्षणिक सहाय्य. 
5)नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या 2 पाल्याना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रु, 20, 000/-एवढे शैक्षणिक सहाय्य. 
6) नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या 2 पाल्याना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस शासनमान्य वैदयकिय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा प्रवेशासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादीसाठी प्रति शैक्षणिक वर्षी वैदयकिय पदवी अभ्यासक्रमांकरिता रु, 1, 00, 000/-व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रु, 60, 000/-इतके शैक्षणिक अर्थ सहाय्य.
7) नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या 2 पाल्याना पदविका मध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रति शैक्षणिक वर्षी रु. 20, 000/- आणि पदव्युत्तर पदविका मध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रति शैक्षणिक वर्षी रु, 25, 000/-एवढे आर्थिक sahay.
8) एका मुलीच्या जन्मानंतर नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगार अथवा नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगार पती / पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रकिया केल्यास एका मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत रु, 1, 00, 000/-मुदत बंद ठेव. 
9)नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगारास 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास रु, 2, 00, 000/-एवढे आर्थिक सहाय्य ( तथापि नोंदीत बांधकाम कामगारांचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा रु, 2, 00, 000/-आर्थिक सहाय्य यापैकी कोणता ही एकच लाभ अनुज्ञेय राहील. )
10)नोंदीत लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या नाम निर्देशित केलेल्या वारसास रु, 10, 000/-एवढी रक्कम अंत्यविधीसाठी मदत. 
11)नोंदीत लाभार्थी कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रु, 5, 00, 000/- एवढे आर्थिक सहाय्य. 
12) नोंदीत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस प्रतिवर्षी रु, 24, 000/-एवढे आर्थिक सहाय्य (फक्त पाच वर्षापर्यंत )
13)नोंदीत लाभार्थी स्त्री बांधकाम कामगारास व नोंदीत पुरुष लाभार्थी बांधकाम कामगारास तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यास गंभीर रोग / आजाराच्या उपचारार्थ रु, 1, 00, 000/-एवढे आर्थिक सहाय्य. 
14)संगणकाचे शिक्षण ( MS-CIT )घेत असलेल्या नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या 2 पाल्याना, शुल्काची परिपूर्ती. तथापि, MS - CIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास सदर शुल्काची प्रतिपूर्ती. 
15)नोंदीत बांधकाम गारांच्या स्वतः च्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु, 30, 00/-अनुदान. 
16) दिनांक 31 ऑगस्ट 2014 रोजी नोंदणी जीवित असलेल्या सर्व बांधकाम कामगारांना दैनंदिन वस्तूच्या खरेदी साठी प्रति कामगार रु,  5000/-एवढे अर्थसहाय्य्य. 
17)नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्याना व्यक्तीमत्व विकास पुस्तकं संचाचे वाटप. 
18)महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगाराकरिता व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचाराकरिता नोंदीत बांधकाम कामगारास रु, 6000/-इतके अर्थ सहाय्य. 
19)नोंदणी पात्र बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व सुरक्षा विमा योजनेंतर्गत अर्थसहाय्य. 
####################
 बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर आपण वरील योजनांचा लाभ घेऊ शकता, 👷👷‍♂️
👉 नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक 👈 👇
1) नोंदणी अर्ज
2) पासपोर्ट आकारातील चार फोटो
3) महानगरपालिका शहर अभियंता यांचा बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
4) ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचा बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
5) नियुक्त्या चे प्रमाणपत्र (90 दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याचे)
6) आधार कार्ड किंवा  मतदान कार्ड
7) रेशन कार्ड झेरॉक्स
8) बँक पासबुक झेरॉक्स
9) काम करत असताना फोटो एक
👷‍♂️👷👷👷👷👷👷
.  अधिक माहिती साठी 
संपर्क : शंकर भाऊ  तडाखे 


8484077555