आई कुठे काय करतेच्या शीर्षक गीताची खास झलक
आई हा शब्द आपल्या सगळ्यांमधे जन्मत:च भिनलेला असतो..नाळे पासून सुरू होणारं हे नातं आजन्म एका अनामिक धाग्याने प्रत्येकाभोवती विणलं जात असतं..आई आपल्यासाठी झटते, राबते आणि प्रसंगी लढते सुध्दा! स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या “आई कुठे काय करते!” ह्या मालिकेच्या शीर्षक गीतामध्ये देखील आई ह्या संवेदनेतून उतरणारी भावना ओतप्रोत भरलेली आहे..गुरू ठाकूर ह्यांच्या लेखणीतून उतरलेले हळवे शब्द अन् अवधूत गुप्ते यांचं सुमधूर संगीत आणि मनात आईपण जपणारे सुरेल स्वर गायले आहेत वैशाली सामंत आणि आर्या आंबेकर ह्यांनी ..ह्या शीर्षक गीतापासून सुरू होणारा हा सुरेल प्रवास आई ह्या शब्दाइतकाच निरंतर स्मरणात असेल ह्यात शंकाच नाही..