कर्जत येथील राधा मीरा ट्रस्ट कडून खांडस ग्रामपंचायत मधील आदिवासींना ब्लॅंकेट वाटप

 






राधा मीरा ट्रस्ट कडून खांडस ग्रामपंचायत मधील आदिवासींना ब्लॅंकेट वाटप

 

                             कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी तसेच पाणी टंचाई काळात पिण्याचे पाणी देणाऱ्या राधा मीरा ट्रस्टच्या माध्यमातून खांडस ग्रामपंचायत मधील आदिवासी लोकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.दरवर्षी या संस्थेकडून तालुक्यातील वेगवेगळ्या भागात हिवाळा सुरू झाला की ब्लॅंकेट वाटप केले जाते.

                             राधा मिरा ट्रस्टच्या माध्यमातून वंजारपाडा येथून संस्थेचे अध्यक्ष भरत मेहरा यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार केला जात आहे.या ट्रस्टने वंजारपाडा गाव दत्तक घेतले असून स्थानिक लोकांसाठी मोफत दवाखाना चालविला जात असून मेडिकल स्टोर मधील औषधे देखील मोफत दिली जात असतात.त्याचवेळी यावर्षी पावसाळ्यात शेकडोच्या संख्येने छत्र्यांचे वाटप करण्यात आले.ट्रस्टच्या वंजारपाडा येथील मंदिरात अन्न छत्र देखील कायम सुरू असते.यावर्षी संस्थेकडून खांडस ग्रामपंचायत मधील आदिवासी वाद्यांमधील लोकांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत मेहरा यांच्यासह खांडस ग्रामपंचायतचे सरपंच मंगल ऐनकर,ग्रामपंचायत सदस्य अंकुश ऐनकर,कैलाश ऐनकर तसेच संस्थेचे कार्यकर्ते ऍड महेश आगे, वर्षा थिटे,स्वप्नाली कोजवे, राजेश पिल्लई, तानाजी डांगरे आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

फोटो ओळ 

आदिवासी लोकांना ब्लॅंकेट चे वाटप करताना

छाय ः गणेश पवार