पुणे प्रवाह न्युज पोर्टल चलो अक्कलकोट.. तालुका पत्रकार संघांच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा..

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



चलो अक्कलकोट..


तालुका पत्रकार संघांच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा..


आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांच्या 


पुरस्कारांचे वितऱण 8 फेब्रुवारी रोजी अक्कलकोटला..


मुंबईः राज्यात विखुरलेले तालुका पत्रकार संघ हे मराठी पत्रकार परिषदेचं बलस्थान आहे.परिषदेची आंदोलनं असोत की,विविध उपक्रम.. राज्यभरातील 354 तालुका पत्रकार संघांमध्ये ते जाणीवपूर्वक राबविले जातात.याशिवाय हे तालुका संघ विविध सामाजिक उपक्रम  राबवून 'आम्ही समाजाचे काही देणं लागतो' हे देखील समाजाला दाखवून देत असतात.दुर्दैवानं आतापर्यंत तालुका संघांच्या कार्याची फारशी दखल घेतली जात नसे.मात्र गेली चार पाच वर्षे उत्कृष्ठ कार्य करणार्‍या तालुका संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम परिषदेने सुरू केला आहे.राज्यातील नऊ महसूल विभागातून प्रत्येकी एक अशा नऊ तालुका पत्रकार संघांची निवड करून त्यांचा अथोचित सन्मान केला जातो.राज्यातील एका जिल्हा संघाला देखील रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने गौरविले जाते..


त्याचबरोबर तालुका पत्रकार संघांच्या अडचणी,त्यांची दुःख,परिषद आणि जिल्हा संघांकडूनच्या अपेक्षा त्यांच्याशी थेट संवाद साधून जाणून घेण्याचाही प्रयत्न परिषदेचे पदाधिकारी गेली पाच  वर्षे करीत आहेत.तालुका संघातील पदाधिकार्‍यांचा मेळाव्याच्या माध्यमातून हा संवाद साधला जातो.याच मेळाव्यात पुरस्कार वितरणही केले जाते.यापुर्वी नागपूर,पाटण,वडवणीत असे मेळावे झाले.


2019 चे आदर्श तालुका आणि जिल्हा पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुका संघाच्या पदाधिकार्‍यांचा मेळावा 8 फेब्रुवारी 2020 रोजी अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आला आहे.आम्हाला  खात्री आहे की,पेन्शन,छोटया पत्रांचे प्रश्‍न आणि संरक्षण कायदा हे सारे विषय मार्गी लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा मेळावा होत असल्याने  या अगोदरच्या मेळाव्याप्रमाणेच राज्यातील  तालुका आणि जिल्हा संघांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं मेळाव्यास उपस्थित राहतील याची आम्हाला खात्री आहे.ज्या तालुक्यांचा अक्कलकोट नगरीत सन्मान होणार आहे त्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील.सोलापूर जिल्हा पत्रकार संघ आणि अक्कलकोट तालुका पत्रकार संघाने या कार्यक्रमाचे यजमानपद स्वीकारले आहे.अधिक माहितीसाठी सोलापूर जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस पी.पी.कुलकर्णी यांच्याशी 9422651516 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.


स्वामी समर्थांच्या नगरीत आम्ही आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहोत..


एस.एम.देशमुख 


किरण नाईक 


गजाजन नाईक 
 शरद पाबळे  


संजीव जोशी, 


विजय जोशी