🚩🚩 *आई जिजाऊ वंदन माझे तुझिया चरणाला* *तुज्या पोटी वीर शिवबा आले जन्माला*🚩🚩
सगळीकडे अंदाधुंदी माजली होती...माता भगिणींची दिवसाढवळ्या मोगलांकडून अब्रु लुटली जात होती...गावंच्या गावं बेचिराख होत होती...आपलेच लोक आपल्या मनगटांची ताकद मोगलाईच्या...आदिलशाहीच्या चरणी वाहून आपसांतच लढत होते...आयाबहिणी घराबाहेर पडायलाही घाबरत होत्या...तरुण मुलींना कधी कोणी यवन येईल आणि आपल्याला त्याची बेगम बनून अंधारात खितपत पडायला लावेल ही धास्ती होती...माता भगिणी प्रचंड दहशतीत होत्या.
या दहशतीमधून आयाबहिणींना बाहेर काढून एक स्ञी म्हणून ज्या मातेने स्वातंत्र्याची पहाट दाखवली...परकी स्ञी ही मातेसमान असते अशी शिकवण दिली...आपल्या लोकंना त्याच्या मनगटातील ताकदीची जाणीव करुन दिली...फक्त स्वराज्याचीच निर्मिती नाही...तर दोन छञपतींना ज्यांनी घडवले...अशा त्या आमच्या आऊसाहेबांचा आज जन्मदिन...आमचा सुवर्णदिन...खर्या अर्थाने स्वराज्याच्या निर्मितीची पहाट...!
*आऊसाहेब तुम्ही आता आमच्यामध्ये शरीराने नसलात तरी तुमच्या विचारांचे धन तुम्ही आमच्यासाठी सोडून गेलात...तुम्ही त्या रुपाने आमच्यासोबत कायम आहात हा विश्वास*
*आज यानिमित्तानेआऊसाहेबांचा जन्मदिन हा 'संस्कारदिन' म्हणून ओळखला जावा ही अपेक्षा.*
*आज लाल महाल पुणे येथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन*