प्रायव्हेट कंपनीकडून फसवणूक-जाब विचारणाऱ्या पत्रकारांवर प्राणघातक हल्ला.….

*प्रेसनोट...*


प्रायव्हेट कंपनीकडून फसवणूक-जाब विचारणाऱ्या पत्रकारांवर प्राणघातक हल्ला.….


पुणे: लकी ड्रा चे अमिष दाखवून सामान्य जनतेला आपल्या कंपनीत बोलावून लाखो रुपयांची गुंतवणूक करायला अनेक प्रायव्हेट कंपन्या सांगत असतात.या आमिषाला अनेक सामान्य नागरिक बळी पडतात.पुणे-मुंबई सह अशा अनेक कंपन्या विविध शहरात आहेत.सूट-बोट कोट परिधान केलेली ही मंडळी शहरात कंपनी उभी करून टूर अँड ट्रॅव्हल्स च्या नावाखाली पैसे गुंतवायला सांगून फसवणूक करीत असतात.असाच प्रकार पिंपरी-चिंचवड मधील रोयरा कार्पोरेट कंपनीबाबत घडला आहे.पिंपरी चिंचवड मधील स्टार बझार च्या बाहेर काही महिला या कंपनीच्या लकी ड्रा चे फॉर्म भरून घेत असताना सदर ठिकाणी  पत्रकार कल्पेश परमार मॉल मधून खरेदी करून परतत असताना नको म्हणत असतानाही लकी ड्रॉ चा फॉर्म या महिलांनी भरून घेतला.दुसऱ्या दिवसापासूनच परमार यांना आपण लकी ड्रॉ साठी सिलेक्ट झाल्याचे सांगत मागच्या ८-१० दिवसापासून फोन,संदेश सदर कंपनीकडून येत होते.नेमका प्रकार काय हे पाहण्यासाठी परमार आणि त्यांचे सहकारी कंपनीत गेल्यानंतर टूर आणि ट्रॅव्हल्स बाबत माहिती देऊन लाखो रुपये गुंतविण्यासाठी सांगत होते.परमार यांनी आपल्याला अशा कोणत्याही प्रकारचा लाभ घ्यायचा नसल्याचे सांगितले.घडलेल्या प्रकारानंतर दोन दिवसांनी दि.८/१/२०२० रोजी परमार,त्यांचे सहकारी पत्रकार आकाश भोसले,सामाजिक संस्था चालवत असलेल्या महिला अध्यक्षा कंपनीबाबत आणि लकी ड्रॉ च्या नावाखाली करीत असलेल्या फसवणुकीबाबत माहिती विचारण्यासाठी गेले असता त्यांच्याशी हुज्जत घालण्यात आली.पत्रकार भोसले यांनी सदर कंपनीच्या बाहेर वार्तांकन करण्यास सुरुवात केल्यानंतर सदर कंपनीचे गुंड प्रवृत्तीच्या डायरेक्टर आणि सहकाऱ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यावेळी धारदार शस्त्राने जीवे मारण्याच्या उद्देशाने परमार यांच्या डोक्यात दुखापत केली.यावेळी संस्थेच्या महिला अध्यक्षा यांनी मारहाण करू नका,असे म्हंटल्याने त्यांनाही शिवीगाळ करत विनयभंग करण्यात आला.घडलेल्या प्रकारानंतर सदर ठिकाणावरून पत्रकार भोसले यांनी पोलिसांना संपर्क केल्यानंतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून सुटका झाली.यानंतर वाय सी एम हॉस्पिटल ला उपचार घेतल्यानंतर कंपनीचे डायरेक्टर आणि त्यांच्या अन्य ७-८ सहकाऱ्यांवर पिंपरी पोलीस ठाण्यात कलम ३२४,३५४,१४१,१४३,१४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कंपनीच्या एका इसमास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक, उत्कर्षा देशमुख करीत आहेत.