नित्याचीच वाहतूक कोंडी कडे वाहतूक पोलीस आणि ढिंगाऱ्या साचल्याकडे मनपा प्रशासन दुर्लक्षामुळे ,नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत जे.डब्लु मेरीट हाँटेल चौक ते कै.बबनराव थोंडींबा चौक विद्याभवन स्कूल येतील रस्ता व फुटपाथवर दरम्यान सदरील फोटो असून,याभागात खड्डे आणि मातीच्या ढिंगाऱ्यांचे साम्राज्य असल्यासारखे चित्र बाराही महिने सदैव असते.
त्यामुळे या भागात नित्याच्यी वाहतूक कोंडी ला सर्व नागरिकांना सामोरे जावे लागते.या भागातून प्रवास करताना ,नेहमीच छोटे - मोठे अपघात होणे नित्याचीच बाब झाली आहे.याला स्वर्स्वी जवाबदार महानगरपालिका स्वच्छता विभाग आणि वाहतूक प्रशासन आहे . या भागातील सामाजिक कार्यकर्ते मा.रमेश भंडारी प्रत्येक नागरिक समस्यांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्नशील असतात.परंतु या भागातील नगरसेवक किंवा संबंधित अधिकारी वर्ग ,त्यांच्या मागणींला आणि निवेद्नाला केराची टोकरी दाखवितात,असा त्यांचा आरोप आहे. सततच्या पाठपुराव्याला कुणीही प्रतिसाद देत नाही.
तसेच या भागातील नागरिकांना कुणी वारी उरला आहे की नाही,कधी रस्त्यावर मैला आल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि रोगराईंना सामोरे जावे लागते. तसेच  साचणाऱ्या मातीच्या ढिंगाल्यामुळे नियमितपणे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.यापासून कधी सुटका होणार ,अशी चर्चा सदरील भागातील नागरिक करतांना दिसतात.