सशक्त युवा, सशक्त राजकारण ,सशक्त भारताकरीता 5th युवा संसद पुण्यात* डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजन

*सशक्त युवा, सशक्त राजकारण ,सशक्त भारताकरीता 5th युवा संसद पुण्यात*


डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजन
देशभरातील विद्यार्थ्यांना संसदेकरीता मोफत प्रवेश


पुणे : सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारताकरीता तरुणाईने पुढाकार घ्यावा तसेच युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता पुण्यामध्ये पाचव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे बुधवार, दिनांक २९ व गुरुवार, दिनांक ३० जानेवारी २०२० रोजी संस्थेच्या सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत ही संसद होणार आहे. यामध्ये देशभरातील राजकारण, समाजकारण आणि विविध विषयांतील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी तरुणांना मिळणार आहे, अशी माहिती संसदेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष डॉ.सुधाकरराव जाधवर उपस्थित होते.
नेहरु युवा केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कॉमनवेल्थ युथ कौंिन्सल, लायन्स क्लब यांच्या सहकार्याने ही संसद होत आहे. संसदेकरीता देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यंदा संसदेच्या कार्यकारणीचे अध्यक्ष माजी मंत्री एकनाथ खडसे हे असणार आहेत. तर सुषमा अंधारे, राजेश पांडे, राहुल कराड, रविंद्र आंबेकर, प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर हे देखील संसदेच्या कार्यकारिणीमध्ये आहेत. महाराष्ट्र व गोवा येथून विद्यार्थी संसदेत सहभागी होणार आहेत. तर पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, कोकण, मुंबई यांसह मराठवाडा या भागांतून २ २००० हून अधिक विद्यार्थी संसदेकरीता पुण्यामध्ये येणार आहेत.
प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर म्हणाले, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध विषयांवर संसदेत चर्चा होणार आहे. सशक्त युवा सशक्त राजकारण सशक्त भारत, भारतीय पत्रकारिता - किती लोकाभिमुख किती पक्षाभिमुख, भारत महासत्ता बनण्याचे प्रवेशद्वार - धर्म, शिक्षण, राजकारण?, सक्षम युवा समर्थ भारत, ग्रामसभा ते लोकसभा अशा विषयांवर संसदेत सत्र होणार आहेत. वयवर्षे १८ ते ४० मधील तरुणांनी संसदेत सहभाग घ्यावा. संसदेत सहभागी होण्याकरीता मोफत प्रवेश असून विद्यार्थ्यांची एक दिवसाची पुण्यामध्ये राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात येणार आहे.
देशभरातील विद्यार्थ्यांनी संसदेतील सहभागाकरीता ८६०५७६९९७० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा dr.sudhakarraojadhavartrust@gmail.com या ईमेल वर स्वत:चे नाव, महाविद्यालयाचे नाव, पत्ता आदी माहिती पाठवावी. त्यानुसार विद्यार्थ्यांची नोंदणी करता येईल. संसदेच्या माध्यमातून युवकांनी राजकारण आणि समाजकारणातील दिग्गजांसोबत संवाद साधावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. संसदेकरीता प्रवेश विनामूल्य आहे, तरी तरुणांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले केले.
#JadhavarGroup 
#5thYuvaSansad