राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यासाठी पूर्वनियोजन बैठक संपन्न

राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यासाठी पूर्वनियोजन बैठक संपन्न


पुणे दि. 4 :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम 25 जानेवारी, 2020 रोजी जिल्हयात साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे पूर्वनियोजनासंदर्भात उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी आज आढावा बैठक घेतली.
             जिल्हा निवडणूक अधिकारी सावंत म्हणाल्या, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीचा जिल्हा स्तरावरील राष्ट्रीय मतदार दिवस हा पर्वती मतदारसंघात साजरा करण्यात येणार आहे. नागरीकामध्ये निवडणुक विषयक माहितीचा प्रसार होण्यासाठी तसेच जास्तीत जास्त भावी मतदार व नवमतदारांमध्ये मतदार नोंदणीसाठी जागृती करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आगळा-वेगळा साजरा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशा सूचनाही सावंत यांनी संबंधितांना दिल्या. तसेच शाळा, महाविद्यालयामध्ये रांगोळी, चित्रकला,निबंध यासह विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तराबरोबरच तालुका, मतदान केंद्रस्तरावरदेखील असे कार्यक्रम होतील, असे त्यांनी सांगितले.
       या बैठकीस जिल्हयातील उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 


0000


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image