पुणे मिडिया वॉच,पुणे व सिद्धार्थ वाचनालय यांच्या तर्फे *पत्रकार दिनानिमित्त ,पुरस्कार सोहळा संपन्न

*बेस्ट सिटीजन जर्नलिस्ट अवार्ड  रामदास सूर्यवंशी  यांना प्रदान*


पुणे मिडिया वॉच,पुणे व सिद्धार्थ वाचनालय यांच्या तर्फे *पत्रकार दिनानिमित्त आदर्श सिटीजन जर्नलिस्ट पुरस्कार बारा बलुतेदार समाज विकास संघाचे प्रदेश अध्यक्ष व साप्ताहिक अशोक वार्ता न्यूजलाईनचे संपादक श्री.रामदासजी सूर्यवंशी यांना जेष्ठ पत्रकार श्री.हेमंत देसाई यांच्या हस्ते तर जेष्ठ नेते श्री.भीमराव पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली* आणि सा.का.श्री.शांताराम कुंजीर,श्री.सुखदेव सोनवणे,श्री.गोपालदादा तिवारी,श्री महेश जांभुळकर, श्री.बप्पूसाहेब गाणला, श्री.विकास भांबुरे यांच्या उपस्थितीत स्मृतीचिन्ह मानपत्र,शाल, श्रीफळ देऊन करण्यातआला.
      रामदास सूर्यवंशी यांनी सुरुवातीस दैे.सकाळमध्ये काम केले होते. त्यानंतर साप्ताहिक अशोक वार्ता न्यूजलाईनचे संपादक म्हणून गेली २१ वर्षे  अव्याहतपणे काम करीत आहेत.त्या माध्यमातून राज्याच्या व शहराच्या समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी सातत्याने त्यांनी अनेकदा यशस्वी पाठपुरावा केलेला आहे.बारा बलुतेदार संघाच्या माध्यमातून त्यांनी बलुतेदार समाजाचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केलेले आहेत.
   यापूर्वी त्यांना छ. शिवाजी महाराज आदर्श कार्यकर्ता पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. 
       यावेळी बारा बलुतेदार समाज विकास संघाच्यावतीने सर्वश्री. राजेंद्र पंडित,रोहित यवतकर,शैलेश बडदे,महेश जांभूळकर,विकास वांबुरे,राजेश भोसले,प्रशांत झनकर, सुभाष जाधव,विनायकराव गायकवाड,सूर्यकांत भोसले,उमेश क्षीरसागर,दीपक डेंगे, रविंद्र मावडीकर,प्रशांत गायकवाड,चेतन मोरे आदींच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.