मुला जीवनाच्या वाटेवर जरा जपून चाल,

लमा शेवाळकर...
.....................
मुला जरा जपून चाल..
...............................
मुला जीवनाच्या वाटेवर
जरा जपून चाल,
रस्ता कधीच सरळ नसतो
चूकुन ठेच लागलीच तर,
आईबाबांची आठवन जरुर काढ.
तुझ्या प्रत्येक जख्खमावर
मलम लावणारे तेच होते.
डोळ्यातील अश्रू लपवीत,
लटकेच हसू आणनारे तेच होते.
तू आकाशी भरारी मारावं,
हे स्वप्न पहाणारेही तेच होते.
बाळा खूप मोठा व्हो,
पण...आपल्या माणसा पासून
दूर कधीच जाऊ नको.
उद्धट होऊ नको,
आपले पणा जपून ठेव
विनय शील व्हो,
असे सांगणारे तेच होते....
त्यांचा तू आधार व्हो.......
.............................................

   आपला शुभचिंतक
लमा शेवाळकर नांदेड
......................................।..