विश्वनाथ स्पोर्ट मीट 2020 राज्यातील खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा उभारणार क्रिडा मंत्री सुनील केदार यांचे प्रतिपादन; चौथ्या विश्वनाथ स्पोर्टस्‌  मीट २०२० चे उद्घाटन

विश्वनाथ स्पोर्ट मीट 2020
राज्यातील खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा उभारणार
क्रिडा मंत्री सुनील केदार यांचे प्रतिपादन; चौथ्या विश्वनाथ स्पोर्टस्‌  मीट २०२० चे उद्घाटन
उद्घाटनाच्या सामन्यात एआयटी दिघी, वर्तक महाविद्यालय मुंबईची विजयी सलामी
------------
पुणे, ता. २० जानेवारी :-  शालेय जीवनापासून खेळाला अधिक महत्व देण्यासाठी आणि उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावे, यादृष्टीने राज्य शासाठन कार्य करत आहे. खेळासाठी सुविधा अत्यंत महत्वाच्या असतात. महाराष्ट्रातून ऑलिम्पिक पटू  घडविण्यासाठी आणि देशाचे जगभर नाव व्हावे यासाठी आत्यधुनिक आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊ. त्याच प्रमाणे खेळाद्वारे देश उभारणी आणि युवक कल्याणासाठी महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिल, असे प्रतिपादन, महाराष्ट्राचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले. 
 
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर याच्यातर्फे आयोजित चौथ्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विश्वनाथ स्पोर्टस्‌ मीट - २०२० च्या उद्‌घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी शिरूरचे आमदार अशोक पवार, ऑलिम्पियन व अर्जून पुरस्कार विजेती (शुटिंग) तेजस्वीनी सावंत-दरेकर, महाराष्ट्राचे क्रिडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, कुलसचिव शिवशरण माळी, विश्वनाथ स्पोर्टस्‌  मीट २०२० च्या नियोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश पाटील, डॉ. किशोर रवांदे, समीर दरेकर, सुभेदार सोममंगल, गायकवाड क्रिडा संचालक पद्माकर फड आदी उपस्थित होते. 


दरम्यान एमआयटी एडीटी विद्यापीठाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या खेळाडूंनी मशाल पेटवून उपस्थित सर्व खेळाडूंनी खिलाडीवृत्तीने खेळण्याची शपथ दिली. फुटबॉल सामन्याची सुरुवात आणि एलइडी स्क्रीनच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे क्रिडा मंत्री सुनील केदार, ऑलम्पियन आणि अर्जून पुरस्कार प्राप्त (शुटिंग) तेजस्वीनी सावंत, क्रिडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी किक मारून सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्रातून ३ हजाराहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. यावेळी विविध महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या खेळाडूंनी मार्शपास केले. राष्ट्रीय खेळाडू अहोना मजुमदार, सिद्धार्थ गर्ग यांचा सत्कार करण्यात आला.


मंत्री सुनील केदार म्हणाले, खेळ आणि युवक कल्याण हा आजचा महत्वाचा विषय आहे. खेळासाठी आरोग्य हे महत्वाचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून खेळात सहभागी व्हावे. आरोग्य चांगले असले तर विचार मजबूत होतात. राज्याचा क्रिडा मंत्री म्हणून खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम माझे आहे. खेळ विभागाला आज आनंद आहे, कारण खेलो इंडियामध्ये महाराष्ट्र देशात पहिला आहे. खेळाडूसाठी आवश्यक सुविधासह अधिक मानधान देण्यासाठी प्रयत्न करेल. महाराष्ट्रातून ऑलिम्पियन तयार करण्याची आमची इच्छा आहे. युवा देश म्हणून आपला देश ओळखला जातो. आज भारताचा युवा इंटरनेटच्या जाळ्यात युवक अडकला असल्याचे चित्र आहे. यामुळे शारीरिक क्षमता कमी होत असते. अशी पिढी घेऊन आम्ही प्रगतीवर कधी ही जाऊ शकणार नाही. तंत्रज्ञानाला शस्त्र म्हणून वापर करा, मात्र त्याचे आधिन जाऊ नका. महाराष्ट्राने लिड घेऊन काम करावे. पुण्यात खेळाविषयक प्रशिक्षण भरविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 


तेजस्वीनी सावंत म्हणाली, बघितलेली स्वप्न आज पूर्ण झाले. खेळ मनापासून खेळा आणि जिंका. राज्यात खेळासाठीचे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे खेळ महत्वाचे आहे. खेळासाठी कोणतीही शिक्षण शाखा महत्वाचे नसते. खेळात खूप चांगले करिअर आहे. मेहनतीला कोणताही पर्याय नसतो. शांत राहून खेळ खेळून जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कोणत्याही विद्याशाखेत शिक्षण घ्या, मात्र भारताची शान आपला झेंडा अभिमानाने उचावला गेला पाहिजे यासाठी प्रयत्नशील रहा. 


डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, खेळाद्वारे देश उभारणीसाठी आमचे कार्य सुरू आहे. खेळासाठी शिस्त आणि चारित्र हे महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये  निर्माण करण्याचे कार्य एमआयटीतर्फे केले जात आहे. आजचा तरूण हा वैश्विक भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा आहे. सर्वांगिण विकासासाठी विद्यार्थ्यांना मेहनतीशिवाय पर्याय नाही. तेजस्वीनी सावंत यासारखी अनेक खेळाडू देशातून आणि महाराष्ट्रातून निर्माण व्हावी. खेळाची संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी विद्यापीठातर्फे प्रयत्न केले जात आहे.   



उद्घाटनाच्या सामन्यात वर्तक कॉलेज, एआयटी दिघीचे  यांची विजयी सलामी
स्पोर्टस्‌  मीटमधील उद्घाटनाचा फुटबॉल सामना व्हीआयआयटी आणि एएफएमसी, पुणे यांच्यात झाला. तसेच क्रिकेट सामना वर्तक महाविद्यालय मुंबई आणि कॉलेज सांगली यांच्या सामना झाला. वर्तक महाविद्यालयाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १५ षटकात ७ विकेटच्या मोबदल्यात ६७ धावा बनवल्या. वर्तक महाविद्यालयातर्फे तेजस डोंगर यांनी सर्वाधिक २४ धावा आणि ४ षटकात ४ विकेट घेत सामना ४ धावांनी जिंकला. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिघी (एआयटी दिघी) आणि एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग लोणी यांच्यात झालेल्या सामन्यात एआयटी दिघी यांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत एमआयटी एसओईने एआयटीच्या हर्ष याच्या भेदक माऱ्यापुढे (३-१२-३) शरणागती पतकारात १५ षटकात ८० धावपर्यंत मजल मारली. ८० धावाच्या माफक लक्ष्याला प्रत्युतर देत एआयटीने एक विकेटच्या मोबदल्यात सामना जिंकला. जय याने यात ४० धावा केल्या.  


विश्वनाथ स्पोर्टस्‌  मीट २०२० च्या नियोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश पाटील यांनी प्रस्तावना केली. विद्यार्थी सुदेशना रे, वैष्णव काळभोर आणि श्रेया उटेकर यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी स्टिफन सॅबेस्टियन यांनी आभार मानले. 


------
फोटो ओळी ः 
पुणे ः  एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या विश्वनाथ स्पोर्टस्‌  मीटचे उद्घाटन प्रसंगी क्रिडामंत्री सुनील केदार, ओमप्रकार बकोरिया, तेजस्वीनी सावंत, डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. सतीश पाटील, पद्माकर फड, डॉ पी.जी. धनवे.