प.पू.सुधांशुजी महाराज यांचा 15 ते 19 जानेवारी “विराट भक्ति सत्संग व गुरुमंत्र सिद्धिसाधना”.

विश्व जागृती मिशन पुणे मंडलच्या वतीने बुधवार दिनांक १५ जानेवारी ते रविवार दिनांक १९ जानेवारी दरम्यान “ विराट भक्ति सत्संग व गुरुमंत्र सिद्धिसाधना”,या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.विराट भक्ति सत्संग हा कार्यक्रम बुधवार दिनांक १५ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.०० वाजता गणेश कला क्रिडामंच येथे संपन्न होईल.तसेच १६ व १७ रोजी तिथेच सकाळी ९.०० ते ११.०० व संध्याकाळी ५.०० ते ७.०० यावेळात विराट भक्ति सत्संग होईल.तसेच शनिवार दिनांक १८ जानेवारी रोजी विहीरीचे मैदान,तुलसीबागवाले कॉलनी,गजानन महाराज मंदिराजवळ सहकारनगर पुणे येथे सकाळी ९.०० ते ११.०० व संध्याकाळी ५.००ते ७.०० व रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी सकाळी ९.००  ते ११.०० या वेळात “गुरुमंत्र सिद्धिसाधना”संपन्न होईल.१८ व १९ तारखेस होणा-या गुरुमंत्र सिद्धिसाधना साठी नावनोंदणी( रजिस्ट्रेशन) आवश्यक आहे.मिशनचे देशभरात ६५ आश्रम आहेत.तसेच गोशाळा तसेच शाळा महाविद्यालये व आयुर्वेदिक रुग्णालय आहे. अशी माहिती विश्व जागृती मिशनचे पुणे मंडल अध्यक्ष घनश्याम झंवर,महामंत्री विष्णुभगवान आगरवाल,उपाध्यक्ष गणेश कामठे व संघटन सचिव रविंद्रनाथ द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली.    


छायाचित्र :प.पू सुधांशुजी महाराज.