भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुणे मनपाचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन,

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुणे मनपाचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन,
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुणे महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून २६ जानेवारी २०२० रोजी ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन सकाळी ७ वाजून ५५ मि, होणार आहे,
सकाळी ८ वाजून ५ मि, मा, महापौर यांचे हस्ते ध्वजारोहण व राष्ट्रध्वजास मानवंदना समारंभ होईल,
सुरक्षा विभाग संचलन झाल्यावर सन्मान सायकल रॅली प्रारंभ होईल,व सायकल क्लब कार्यालयाचे उदघाटन आरोग्य विभाग ३,मजला येथे होईल,
नवीन इमारतीमधील स्थायी समिती हॉल मध्ये विविध प्रणालीचे सादरीकरण होणार आहे,
सकाळी १०,३० वाजता मुख्य भवनातील श्री,छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ( जुने ) विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सत्कार होणार आहे,
--माहिती व जनसम्पर्क विभाग,
पुणे महानगरपालिका,
२५/०१/२०२०