संगीतामुळे हा देश कधीच तुटू शकणार नाही सुप्रसिध्द दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचे प्रतिपादन; ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’चे उद्घाटन

कृपया प्रसिद्धीसाठी      दिनांक 30 डिसेंबर 2019


संगीतामुळे हा देश कधीच तुटू शकणार नाही
सुप्रसिध्द दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचे प्रतिपादन; 'एमआयटी सांस्कृतिक संध्या'चे उद्घाटन


पुणे, दि. 30 डिसेंबर:“ या देशाला संगीताने जोडले असून तो देशाचा अविभाज्य भाग आहे. संगीताने दोन धर्माला जोडून त्याला अजराअमर केले आहे. त्यामुळे हा देश कधीच तुटु शकणार नाही. येथे मुस्लिम गुरू असून शिष्य हिंदू आहे. तसेच काही ठिकाणी हिंदू गुरू असून शिष्य मुस्लिम असल्याचा इतिहास आहे.ं,”असे प्रतिपादन 100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष व सुप्रसिध्द दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी विश्वराजबाग, लोणी-काळभोर येथील विश्वराज बंधारा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय 'एमआयटी सांस्कृतिक संध्या' संगीत महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी पटेल फाउंडेशनचे अध्यक्ष एम. के.पटेल, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका प्रा. ज्योती कराड-ढाकणे, नागपूर विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन. पठाण, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड चाटे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, विश्वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव श्री.आदिनाथ मंगेशकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते.
डॉ. जब्बार पटेल म्हणाले,“ देशात अनेक संगीत घराणे आहेत. त्यात धृपद गाणारे घराणे हे मुस्लिमांचे आहे. येथे मन तरपत हरी दर्पण के लिए हे गीत एका मुस्लिमाने लिहिले असून सर्वेत्कृष्ठ कव्वाली हिंदू व्यक्तीने लिहिलेली आहे. जगातील सर्वेत्कृष्ठ शहनाई वादक बिस्मिला खाँ.एका कार्यक्रमात अमजद अली यांच्या सरोज वादनात येवढे गुंतले होते की त्यांची नमाजाची वेळ निघून गेली. त्यावेळी ते म्हणाले होते की संगीत हीच इबादद आहे.”
“कला आणि विज्ञान यांचा उत्तम संगम या विद्यापीठात दिसून येतो. संगीत साधना ही सर्व शास्त्रांमध्ये सर्वेच्च आहे. यात नाद व ताल आहे. नव वर्षात नादमय व तालमय होऊन पुढील वर्ष संपूर्ण देशाने याला पाळला पाहिजे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ एमआयटी संस्कृती संध्या ही संगीताच्या साधनेतून शांतरसाची अनुभूती देणारी आहे. त्यातूनच प्रत्येकाला ईश्वराच्या दर्शनाकडे घेऊन जाते. वैश्विक भारतीय संस्कृती ही मानवतावादी आहे. आजच्या तरूण पिढीला भारतीय संस्कृतीचा विसर पडत चलालेला आहे. त्यांच्यामध्ये भारतीय संस्कृती रूजविण्यासाठी हिंदुस्थानी संगीत महत्वाची भूमिका बजावेल.”
डॉ. सुनील राय म्हणाले,“ ही संगीत संध्या नसून संस्कृती संध्या आहे. नववर्षला साजरा करण्यासाठी चांगले वर्तन हवे. नव वर्ष हे ईश्वराची देणगी आहे. नवयुवकांनी ईश्वराला धन्यवाद दया की त्यांनी आम्हाला अणखी एक नवीनवर्ष जीवन जगण्यासाठी दिले. या पवित्र कार्यक्रमासाठी एमआयटीमध्ये येणे म्हणजे ईश्वराबरोबर जोडल्या सारखे आहे.”
या संगीत महोत्सवाच्या उद्घाटनानंतर युवा शास्त्रीय गायक रमाकांत गायकवाड, शास्त्रीय गायक रवींद्र यादव, सुप्रसिद्धा व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये, सुप्रसिध्द पखवाज वादक पं.उध्दवबापू आपेगावकर आणि प्रख्यात ध्रुपद संगीत गायक पं. सुप्रियो मोईत्रा यांनी आपली कला सादर केली.  
आदिनाथ मंगेशकर यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.