“स्वयंसेवी संस्था व व शासन यांच्या योग्य समन्वयानेच पंचायतराज सक्षमीकरण शक्य होईल”.-आ.डॉ.निलमताई गो-हे.

) “स्वयंसेवी संस्था व शासन यांच्या योग्य समन्वयानेच पंचायतराज सक्षमीकरण शक्य होईल,यासाठी स्वयंसेवी संस्थांनी या स्तरावर काम करून शासनाला योग्य त्या बाबी सुचविल्या पाहिजे व फक्त त्रुटी दाखवून न थांबता या सूचनांचा पाठपुरावा करावा.यासाठी आवश्यक तिथे शासन दरबारी मदत करण्याचा प्रयत्न आपण करू”असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती आ.डॉ.निलमताई गो-हे यांनी केले.अफार्म(अॅक्शन फॉर अॅग्रिकल्चरल रिन्युअल इन महाराष्ट्र,पुणे)आयोजित पंचायतराज सक्षमीकरण:आव्हाने व अपेक्षित सुधारणा यावरील राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.एस एम जोशी भवन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमोद देशमुख(अध्यक्ष अफार्म),सुभाष तांबोळी(कार्यकारी संचालक अफार्म).डॉ.मिलिंद बोकील(समाजविकास तज्ञ व लेखक) आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संखेने उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात प्रमोद देशमुख यांनी कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते तर आहे त्या व्यवस्थेचा स्विकार करून सुधारणा केली पाहिजे असे संगितले.या एकदिवसीय परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्र व मार्गदर्शन करण्यात आले.प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ.निलमताई गो-हे यांनी उत्तरे दिली.   


छायाचित्र :डावीकडून प्रमोद देशमुख,निलमताई गो-हे,मिलिंद बोकील॰