मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच माथेरान पर्यटनस्थळाकडे विशेष लक्ष...... प्रेरणा सावंत नगराध्यक्ष माथेरान

 


कर्जत, दि. 10 गणेश पवार
                         राज्यातील आघाडीचे प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानकडे राज्य सरकार ने कानाडोळा केला होता.मागील तीन वर्षांत भाजप सरकार ने या पर्यटन स्थळाला एकही रुपयांचा निधी दिला नाही. 5 डिसेंबर रोजी मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने माथेरानसाठी तातडीची बैठक घेण्यात आली होती.त्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना माथेरान मधील प्रकल्पावर तातडीने लक्ष देण्याच्या सूचना केल्या.
                          त्यातच यावर्षी माथेरान मध्ये विक्रमी पाऊस पडला,त्यामुळे माथेरान मधील अंतर्गत रस्त्यांची वाताहत झाली आहे.या रस्त्यांसंदर्भात ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माथेरानच्या विकासासंदर्भात निधीसाठी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सतत भेट घेतली.येथील सत्ता ही शिवसेनेची असल्यामुळे फडणवीसांनी याकडे कानाडोळा केला.पण मुख्यमंत्री पदावर कार्यरत झाल्या आहेत.राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माथेरानकडे विशेष लक्ष दिले आहे असून राज्य सरकारकडे ठराव केलेले काही प्रस्ताव सादर करण्यास सांगितल्याने पुन्हा एकदा ठाकरे परिवाराचे माथेरानवर असलेले प्रेम समोर आले आहे.
                               मंत्रालयात झालेल्या या बैठकीत प्रधान सचिव अजॉय मेहता आणि नगरविकास खात्याच्या मनीषा म्हैसकर उपस्थित होत्या.यावेळी माथेरानच्या पालिकेत केलेले ठराव घेऊन तो प्रस्ताव राज्य सरकार कडे पाठवून नगरोत्थान अंतर्गत 25 कोटी निधीला तत्वतः मान्यता मिळाली असून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर जानेवारी महिन्यापर्यंत तो निधी नगरपालिकेकडे वर्ग केला जाईल असे प्रधान सचिव अजॉय मेहता यांनी नगराध्यक्षा याना सांगितले.तसेच मार्च 2018 रोजी फुटबॉल खेळाला प्रसिद्धी देण्याकरिता आमदार आदित्य ठाकरे हे माथेरान मध्ये आले त्यावेळेस त्यांना माथेरानचे वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल खूप भावले व त्यांनी माथेरानचे हे क्रीडा संकुल सुसज्ज करण्यासाठी मदत करू असे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता करण्यासही हिरवा कंदील मिळाला आहे.त्या संकुलाचे सुधारीकरण आणि सुशिभिकरणासाठी नगरपालिकेकडून प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत.लवकरच या ठरावाची तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर सुसज्ज मैदानासाठी पर्यावरण पूरक क्रीडा संकुल बनविण्यासाठी नगरपालिकेकडे 7 कोटी रुपये वर्ग केले जाणार आहे.हा निधी जानेवारी पर्यंत पालिकेकडे वर्ग करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


 


 



  --- ठाकरे घराण्याचे माथेरानवर असलेले आपलेपण --
बाळासाहेब ठाकरे यांचे माथेरान हे आवडते ठिकाण.75 ते 85 च्या दशकात बाळासाहेब ठाकरे हे माथेरान मध्ये येत असत या माथेरान साठी खूप काही करण्याची त्यांची इच्छा होती.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी माथेरान वर आपलेपणा दाखविण्यास सुरुवात केली आहे.बाळासाहेबांचे नातू आमदार आदित्य ठाकरे ही माथेरान मध्ये सकारात्मक आहेत.त्यामुळे ठाकरे घराण्याचा आपले पणा दिसून येत आहे असे माथेरान मधील जेष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.


 



प्रेरणा सावंत-नगराध्यक्ष
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून  माथेरानच्या रखडलेला विकासाबाबत सविस्तर चर्चा करून प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले आहे.येणाऱ्या काही वर्षांत माथेरानचा पर्यावरण पूरक विकास करून सर्व प्रश्न मार्गी लावू.


 


 


फोटो ओळ:-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत नगराध्यक्षा प्रेरणा सावंत आणि बांधकाम सभापती प्रसाद सावंत
छाय ः गणेश पवार