*भारतीय विद्या भवनमध्ये ३ जानेवारी  रोजी 'लावणी मैफल '*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल    
                                                                                             
 *भारतीय विद्या भवनमध्ये ३ जानेवारी  रोजी 'लावणी मैफल '*
--------------------------------
'भारतीय विद्या भवन','इन्फोसिस फाऊंडेशन'च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन


पुणे ः


'भारतीय विद्या भवन' आणि 'इन्फोसिस फाऊंडेशन'च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ' लावणी मैफल' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 


शुक्रवार, ३ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता 'भारतीय विद्या भवन'चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.'भारतीय विद्या भवन'चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.'हार्मनी 'इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक' प्रस्तुत  या कार्यक्रमात गिटार ,माऊथ ऑर्गन ,इलेक्ट्रॉनिक कि -बोर्ड या माध्यमातून  मराठी  लावण्या सादर केल्या  जाणार आहेत.


प्रशांत पै,अमोल जोशी,दीपाली  उपाध्याय,कैवल्य खिस्ती,क्रिश चौधरी,संदीप शिंगाडे,कुमार शेलडेकर ,अविनाश कुलकर्णी,उपेंद्र लक्ष्मीश्वर,जयंत जोशी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. 'भारतीय विद्या भवन' आणि 'इन्फोसिस फाऊंडेशन'च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ९६ वा कार्यक्रम आहे



...........................................