<no title>स्वातंत्र्यसैनिक वि रा देशमुख, गायक नंदेश उमप आणि सामाजिक कार्यकर्ता उल्का महाजन यांना हुतात्मा गौरव पुरस्कार जाहीर... 2 जानेवारी रोजी नेरळ मध्ये होणार सन्मान हुतात्मा स्मारक समिती चा उपक्रम
स्वातंत्र्यसैनिक वि रा देशमुख, गायक नंदेश उमप आणि सामाजिक कार्यकर्ता उल्का महाजन यांना हुतात्मा गौरव पुरस्कार जाहीर...

2 जानेवारी रोजी नेरळ मध्ये होणार सन्मान

हुतात्मा स्मारक समिती चा उपक्रम

कर्जत,दि .24 गणेश पवार

                                   रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लबचा उपक्रम असलेल्या हुतात्मा स्मारक समिती च्या माध्यमातून देण्यात येणारे हुतात्मा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले.

जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक वि रा देशमुख,जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन आणि जेष्ठ गायक नंदेश उमप यांना जाहीर झाला आहे.दरम्यान,2 जानेवारी 2020 रोजी नेरळ येथील हुतात्मा चौकात सिद्धगड बलिदान कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

                           कर्जत-नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर माथेरान नाका येथे हुतात्मा स्मारक समिती यांच्या माध्यमातून दरवर्षी हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या सिद्धगड बलिदान दिन कार्यक्रम 2 जानेवारी 2020 रोजी साजरा केला जातो.या कार्यक्रमात हुतात्म्यांना अभिवादन आणि हुतात्मा गौरव पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.2005 मध्ये स्थापन झालेल्या हुतात्मा स्मारक समितीची स्थापना करण्यात आली असून या स्मारक समिती यांच्या वतीने दरवर्षी सिद्धगड बलिदान दिन कार्यक्रम साजरा केला जातो.या कार्यक्रमात हुतात्मा गौरव पुरस्काराचे वितरण केले जाते,यापूर्वी कला दिग्दर्शक नितीन देसाई,कविवर्य नारायण सुर्वे,हिवरेबाजार चे प्रणेते पोपटराव पवार,अभिनेते अरुण नलावडे,कृषिरत्न शेतकरी शेखर भडसावळे,मुंबई सिद्धिविनायक मंदिर न्याय,सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी,आदिवासी कार्यकर्त्या ठमा पवार,अनसूया पादिर,26/11 मुंबई हल्ल्यातील शहीद योगेश पाटील,इतिहास संशोधक वसंत कोळंबे,नंदकुमार तासगावकर,आदी मान्यवरांना हुतात्मा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

                                  यावर्षी जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक 97 वर्षीय वि रा देशमुख,जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन आणि जेष्ठ गायक नंदेश उमप यांना हुतात्मा गौरव पुरस्कार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.हुतात्मा स्मारक समितीच्या नेरळ येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या पुरस्काराचे वितरण कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे,रायगड चे जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी आणि माजी आमदार सुरेश लाड यांचे हस्ते केले जाणार आहे.या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती नारायण डामसे,कर्जत पंचायत समिती सभापती तसेच कर्जतछटा नगराध्यक्ष सुवर्णा जोशी,माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत,नेरळ चे सरपंच रावजी शिंगवा यांच्यासह प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर,कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख,जिल्हा परिषद सद्स्य अनसूया पादिर,कर्जत पंचायत समिती सदस्य सुजाता मनवे,नरेश मसणे,नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.नेरळ येथील हुतात्मा चौकात होणाऱ्या कार्यक्रमात 2 जानेवारी रोजी सिद्धगड बलिदान दिन कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाची सुरुवात नेरळ मधील माध्यमिक शाळा यांच्या समर गीतांनी होणार असून मुख्य कार्यक्रमात हुतात्मा स्मारक समिती च्या दिनदर्शिका 2020 चे प्रकाशन केले जाणार आहे.

                       हुतात्मा गौरव पुरस्काराची घोषणा हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी केली असून त्या वेळी संघटनेचे सल्लागार संतोष पवार यांच्यासह संजय मोहिते,धर्मानंद गायकवाड, दर्वेश पालकर, अभिषेक कांबळे, जयवंत हाबळे,संजय अभंगे,राहुल देशमुख,अजय कदम,गणेश पवार,दीपक पाटील,कांता हाबळे,अजय गायकवाड,सुमित क्षीरसागर,कायदेशीर सल्लागार ऍड हृषीकेश कांबळे,आदी उपस्थित होते.