नेरळ-माथेरान मिनीट्रेन साठी मध्य रेल्वे कडून जोरदार हालचाली सुरु..... मात्र नवीन वर्षातच मिनीट्रेन नॅरोगेज ट्रक वर
नेरळ-माथेरान मिनीट्रेन साठी मध्य रेल्वे कडून जोरदार हालचाली सुरु..... मात्र नवीन वर्षातच मिनीट्रेन नॅरोगेज ट्रक वर

कर्जत,दि . 24  गणेश पवार

                                   आबालवृद्ध पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन यावर्षी पावसाळयात माथेरानच्या डोंगरात झालेल्या भुस्खनन यामुळे वाहून गेलेला नॅरोगेज मार्ग दुरुस्त करण्याचे कामासाठी नेरळ-माथेरान मिनिट्रेन बंद आहे. मात्र मिनीट्रेन सुरु व्हावी यासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. परंतु जून 2019 पासून बंद असलेली नेरळ- माथेरान मिनीट्रेनची सेवा नवीन वर्षात सुरु होण्याची शक्यता आहे. दरम्यान,त्या आधी अमान लॉज - माथेरान अशी शटल सेवा देखील नेर- माथेरान सेवेच्या सुरु करण्याची मागणी पर्यटन वाढीसाठी केली जात आहे. 

                              नेरळ- माथेरान-नेरळ अशी मिनीट्रेन ची सेवा माथेरान घाटातील पावसाळा लक्षात घेऊन बंद केली जाते. 15 जून पासून बंद होणारी हि सेवा नंतर 15 ऑक्टोबर नंतर पुन्हा पूर्ववत केली जाते. यावर्षी 15 जून च्या आधी मिनीट्रेनची सेवा बंद करण्यात आली होती,तर अमन लॉज - माथेरान हि शटल सेवा जून मध्ये झालेल्या वादळी पावसाळ्यानंतर जुलै 2019 मध्ये बंद करण्यात आली होती. त्यावेळी पावसाळा असल्याने कोणत्याही प्रकारची दुरुस्तीची कामे करता आली नव्हती.मिनीट्रेन असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक हे माथेरान ला येत असतात आणि मिनीट्रेन ची थेट सेवा किंवा शतला सेवा देखील उपलब्ध नसल्याने माथेरानला यावर्षीच्या पावसाळ्यात पर्यटक फार कामी आले होते आणि माथेरान मधील पर्यटन व्यवसाय संकटात आला होता. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर सततच्या पावसाने वाहून गेलेला ट्रक,ट्रक खालील माती आदी कामे करण्यासाठी माथेरान गिरिस्थान नगरपरिषद रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करीत होती. 

                           त्यात यावर्षी पावसाळा लांबल्याने नेरळ- माथेरान-नेरळ मार्गावरील नॅरोगेज ट्रक वरील दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत आणि आजपर्यंत मिनीट्रेन ची सेवा पूर्ववत होऊ शकली नाही. त्यामुळे यावर्षीचा नाताल हंगाम आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी येणारे पर्यटक यांचाही हिरमोड मिनीट्रेन नसल्याने होणार आहे आणि त्या गोष्टीचा माथेरान च्या पर्यटन व्यवसायावर देखील परिणाम जाणवू शकतो. मात्र जनतेचा प्रचंड रेटा यामुळे मिनीट्रेन च्या मार्गाची दुरुस्ती करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून टप्प्याटप्प्याने दुरुस्ती अंतिम टप्प्याकडे जात आहे.त्यातील या मार्गातील 13 किलोमीटर पासून 17 किलोमीटर पर्यंत मोठ्या प्रमाणात जाहले भुस्खनन होऊन नॅरोगेज मार्गावरील आणि मार्गाखालील माती खाली वाहून गेली होती. ती पुरवत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

                               नॅरोगेज मार्गावर दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आहेत,पण नेरळ- माथेरान- नेरळ आणि माथेरान ते अमन लॉज अशी शटल सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक असलेले इंजिन तसेच प्रवासी डब्बे यांची दुरुस्ती नेरळ येथील मध्य रेल्वेच्या कार्यशाळेत सुरु आहेत. प्रवासी सेवा सुरु झाल्यांनतर अधिक चांगली सेवा देण्यासाठी सर्व आठ इंजिने यांना तयार ठेवण्यात येत आहेत. एनडीएम 1 या जातीची नवीन इंजिने मध्य रेल्वे प्रशासन 2018 पासून 2019 कालावधीत बनवून घेतली आहेत. त्याचवेळी पारदर्शक विस्टाडोम चे डब्बे तसेच वातानुकूलीत प्रवासी डब्बे देखील नव्या पर्यटन हंगामासाठी सज्ज होत असून नेरळ- माथेरान-नेरळ मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरु होण्यात अंतिम टप्प्यात वाटचाल सुरु आहे. मात्र त्या आधी शटल सेवा सुरु करावी अशी मागणी सतत पुढे येत आहे. कारण माथेरान चा पर्यटन व्यवसाय हा मिनीट्रेन वर बऱ्यापैकी अवलंबून असतो आणि त्यासाठी माथेरान मधील पर्यटन व्यवसायासाठी, व्यावसायिक यांच्यासाठी मिनीट्रेन ची शटल सेवा सुरु करण्याची आग्रहाची मागणी माथेरानकर करीत आहेत. 

                          त्याचवेळी नेरळ येथे प्रवासी डब्बे हे जोडण्याचे तसेच किरकोळ दुरुस्ती देखील केली जात आहे. नॅरोगेज च्या 21 किलोमीटर लांबीच्या मिनीट्रेन मार्गावर असलेले गर्व काढून टाकले जात आहे. त्याचवेळी त्या नॅरोगेज ट्रक वर साचून राहिलेली माती,दगड हे बाजूला काढून त्या रुळांवर ऑइल टाकले जात आहे. हि सर्व तयारी पाहता नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर मिनीट्रेन ची सेवा नवीन वर्षात सुरु कर्णयचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहेत. 

 

 

 

 

 

ए के सिंग -जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे 

मिनीट्रेन ची सेवा सुरु व्हावी हे मध्य रेल्वे चे पहिल्या पासून प्रयत्न आहेत. त्यासाठी खर्चाची तरतूद मध्य रेल्वे प्रशासनाने करून ठेवली असून मिनीट्रेन सुरु करून दिमाखात हा मार्ग पर्यटकांसाठी खुला करण्याचा मनोदय आहे.