चिखली येथील इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये स्टेम रोबोटिक्स कार्यशाळेत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन

 


रोबोटिक्स शिक्षणपद्धतीमुळे मुलांच्या शैक्षणिक संकल्पनांमध्ये वाढ होते

 एससीसीआयपी जपानचे अध्यक्ष रेन्या किकुची यांची माहिती

चिखली येथील इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये स्टेम रोबोटिक्स कार्यशाळेत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन

 
पिंपरी चिंचवड -
  रोबोटिक्स शिक्षण प्रशिक्षणामुळे शालेय मुलांना वैचारिकदृष्ट्या विज्ञान आणि तंत्रज्ञान एक्सप्लोर करण्याची संधी उपलब्ध होते. अशा मजेदार शिकण्याच्या पद्धती  विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणिताच्या संकल्पना समजण्यास मदत करतात. एकदा विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकल्पनांचे अनुप्रयोग समजल्यानंतर, शिकण्याची आवड वाढते, ज्यामुळे शालेय शैक्षणिक क्षेत्रात उच्च गुण किंवा ग्रेड मिळतात. एकदा विद्यार्थ्याला शिकत असलेल्या संकल्पनांचा उपयोग झाल्याचे समजल्यानंतर ते त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये कायमचे राहते,  असे शास्त्रीय संशोधनाने सिद्ध केले आहे. म्हणूनच,  रोबोटिक्स प्रशिक्षण कार्यक्रम विद्यार्थ्यांना सर्वोच्च शिक्षण देण्यासाठी शालेय शैक्षणिक अभ्यासक्रमासह तयार आणि मॅप केले जातात. विद्यार्थ्यांना रोबोटिक्स शिकवताना त्यांच्यातील नाविन्य आणि सर्जनशीलतेला अत्यंत महत्त्व दिले जाते. रोबोटिक्सचे ज्ञान मुलामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मेकेनिकल, आयटी प्रोग्रामिंग आणि इलेक्ट्रिकलमध्ये अभियांत्रिकी क्षमता वाढवते,  अशी माहिती जपान येथील रोबोटिक्स अभ्यासक तथा एससीसीआयपी जपानचे अध्यक्ष रेन्या किकुची यांनी दिली. चिखली येथील इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल, येथे मंगळवार दि. १० रोजी स्टेम रोबोटिक्स प्रशिक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना रेन्या किकुची बोलत होते. यावेळी, इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलच्या डायरेक्टर कमला बिष्ट, डॉ. गिरीष देसाई, श्री. डेविड, श्रीमती देबोश्री, ॲकॅडेमिक हेड स्मिता जोशी, टिम इंडियाचे श्री. कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी - पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलच्या डायरेक्टर कमला बिष्ट म्हणाल्या, जपानमध्ये रोबोटिक्स अभ्यासक्रम शालेयस्तरावर रुजविण्यात आला आहे. आजच्या आधुनिक युगात रोबोटिक्स शिक्षणाचे महत्त्व वाढले असून भारतातही रोबोटिक्स शिक्षणपद्धती झपाट्याने वाढली आहे. इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलमध्येही रोबोटिक्सचे धडे दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. तत्पूर्वी, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, विद्यार्थ्यांनी योगा सादर केला. रोबोटिक्स शिक्षणाबाबत उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त करत आपले मत मांडले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती दीप्ती जयस्वाल यांनी केले.

 
स्टेम रोबोटिक्स शिक्षणपद्धतीचे काही ठराविक मुद्दे पुढीलप्रमाणे…

-          भौतिकशास्त्र, बीजगणित आणि भूमिती संकल्पना  समजण्यास मदत होते.
-          नमुना रोबोटची रचना, रेखाटन, एकत्र करणे आणि ऑपरेट करणे, या लागणाऱ्या अभियांत्रिकी संकल्पना  
           सहज समजतात.
-          मुलांमधील तार्किक आणि विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता सुधारते.
-          प्रोजेक्ट आधारित दृष्टीकोन व्यक्तिमत्त्व विकसित करण्यास मदत करतो आणि टीम वर्कचे महत्त्व शिकवितो.
-          जागतिकस्तरीय सॉफ्टवेअरद्वारे तांत्रिक शिक्षण...