रामदास आठवले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*

#PRESSNOTE


*रामदास आठवले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*


*सदस्य नोंदणी, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, गुणवंतांचा सत्कार आदी कार्यक्रमाचे आयोजन*


पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले याच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रक्तदान शिबीर, शालेय साहित्याचे वाटप, पक्षाच्या कोथरूड शाखेचे उद्धाटन आणि शहरातील आठही मतदार संघात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. पक्षाच्या मुख्य कार्यालयात आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी दिली.


येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाची मोरे विद्यालय, कोथरूड परिसरात नवीन शाखा सुरु करण्यात आली. शांतीनगर, विश्रांतवाडी, शिवाजीनगर, कोथरूड, हडपसर, मार्केटयार्ड, ताडीवाला रस्ता, अप्पर इंदिरानगर, वडगावशेरी, खराडी आदी भागात सदस्य नोंदणी अभियान राबवले. यावेळी शहरात १० हजार पेक्षा अधिक सदस्यांची नोंदणी झाली. कोथरूड परिसरात माजी सैनिक सभागृह, मोरे विद्यालय येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. आठवलेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पहावयास मिळत होते. या उपक्रमांदरम्यान माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, महिपाल वाघमारे, शैलेश चव्हाण, मोहन जगताप, भगवान गायकवाड, श्याम सदाफुले आदी उपस्थित होते.


शांतीनगर विश्रांतवाडी येथे विनोद टोपे, भीमराव वानखेडे, भाऊसाहेब भालेराव, महेश ओव्हाळ, भीमराव बनसोडे, विशाल कदमसदस्य नोंदणी अभियान घेऊन ५०० नागरिकांना सदस्यत्व दिले. वडगाव शेरी-खराडीमध्ये किरण भालेराव, फिरोज शेख, शमशुद्दीन शेख, अमोल निकाळजे, सचिन संकपाळ, संदीप शिंदे यांनी ८०० जणांना सदस्यत्व दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कोथरूड विभागामध्ये बाबासाहेब तुर्कमारे, ऍड. आनंद कांबळे, बाळासाहेब खंडाळे, अंकुश भोसले, अशोक करंजकर यांनी कार्यक्रम राबवले. मार्केडयार्ड येथे बसवराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ६०० सदस्य नोंदणी झाली. बाबुराव घाडगे, अंबादास कोतले, सुगत धसाडे, अर्जन कांबळे, बाळासाहेब शेलार, उद्धव चिलव॔त, अंबादास पत्रिगडे, शिवशरण गायकवाड, संजय गायकवाड, संजय जमादार, रुपेश सरवदे, सिध्दार्थ बनसोडे, बल्ली झुबरे, अमरशेठ अष्टगे, अबादास गायकवाड, दता कांबळे, लक्षण नडगम, श्रीशैल वामणे, किशोर बनसोडे, आकाश सोनकांबळे इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते नेते मंडळी उपस्थिती होते. हडपसर विभागात संतोष खरात आदी कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी करून घेतले.