अल्पसंख्यांक विभाग पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्षपदी श्री. हाजी युसूफ अ. रज्जाक कुरेशी यांची नियुक्ती...

अल्पसंख्यांक विभाग पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्षपदी श्री. हाजी युसूफ अ. रज्जाक कुरेशी यांची नियुक्ती...             पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागच्या अध्यक्षपदी श्री. हाजी युसूफ अ. रज्जाक कुरेशी यांची निवड करण्यात आली. अल्पसंख्यांक विगाचे प्रदेश अध्यक्ष श्री. गफ्फार मलिक यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले आहे.


      श्री. हाजी युसूफ अ. रज्जाक कुरेशी हे राष्ट्रवादीचे एकनिष्ठ व जुने अभ्यासु कार्यकर्ते असून त्यांचे अल्पसंख्यांक समाजासाठी मोठे योगदान आहे. समाजातील सर्व घटकांना मदत करणे व त्यांच्या प्रगतीसाठी ते पिंपरी चिंचवड शहर जुलुस कमिटीच्या माध्यमातून मागील २० वर्षापासून कार्यरत आहेत.  जुलुस कमिटीचे ते संस्थापक विश्वस्त म्हणून काम पाहतात. उलेमा – ए – कौन्सिल, व कुल जमाती तंजिम पिंपरी चिंचवड शहर या कमिटीवर ते प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहतात. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रभाग अध्यक्ष पिंपरी, चिटणीस व शहर उपाध्यक्ष असे विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.


      त्यांच्या निवडीमुळे समाजातील सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी २०२२ च्या महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता आणण्यात अल्पसंख्यांक समाज हा पुढाकार घेईल, असे कुरेशी यांनी निवडीनंतर सांगितले.