जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये होणार आयपीएलचा अंतिम सामना, एक लाख प्रेक्षक होणार साक्षीदार

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये होणार आयपीएलचा अंतिम सामना, एक लाख प्रेक्षक होणार साक्षीदार
__________________________________


आयपीएल२०२०चा लिलाव संपला आहे. आता आयपीएलचे वेळापत्रक ठरवले जात आहे. यावेळी आयपीएलचा सामना हा जगभरातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.अजूनपर्यंत आयपीएलचे वेळापत्रक ठरवण्यात आलेले नाही. पण जगातील या सर्वात मोठ्या स्टेडियमवर पहिला सामना मोठा व्हायला हवा, असे बऱ्याच जणांना वाटत आहे. त्यामुळे आयपीएलच्या अंतिम फेरीचा सामना या जगतील सर्वात मोठ्या मैदानात व्हायला हवा, असे चाहत्यांना वाटत आहे.जगताील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एक लाख प्रेक्षक बसू शकतात. पण आता काही दिवसांमध्येच जगातील सर्वात मोठे स्टेडियम भारतामध्ये होणार आहे. या स्टेडियममध्ये मार्च महिन्यात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे, असे समजते. गुजरातमधील अहमदाबाद येथे हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम बनवले जात आहे. हे स्टेडियम बांधण्यासाठी ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. जानेवारी २०१७ मध्ये या स्टेडियमच्या बांधणीला सुरुवात झाली होती. आता काही दिवसांमध्ये हे स्टेडियम सज्ज होणार आहे. हे स्टेडियम ६३ एकर जागेमध्ये बनवण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्टेडियममध्ये ५० खोल्याही येणार आहेत. त्याचबरोबर ऑलिम्पिक साईजचे स्विमिंग पूल असून ७३ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. त्याचबरोबर तीन प्रॅक्टीस मैदानंही बनवण्यात आली आहेत. या स्टेडियममध्ये १ लाख १० हजार एवढी आसन व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम असणार आहे.