RTE मध्ये प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या व RTE मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्दयार्थ्यांचा वेगळा वर्ग करून भेदभाव करणाऱ्या व जातीय मानसिकता मानणाऱ्या SNBP शाळेवर कायदेशीर कार्यवाही करणेबाबत

RTE  मध्ये प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या  पालकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या व RTE मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्दयार्थ्यांचा वेगळा वर्ग करून भेदभाव करणाऱ्या  व जातीय मानसिकता मानणाऱ्या  SNBP शाळेवर कायदेशीर कार्यवाही करणेबाबत
   शासनाच्या धोरणानुसार RTE मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कसल्याही प्रकारची फी घेता येत नाही. पिंपरी चिंचवड शहरात SNBP या शाळेच्या मोरवाडी रहाटणी आणि मोशी अश्या ३ शाखा आहेत  या शाळेने इतर उपक्रमाच्या नावाखाली  पालकांची दिशाभूल करून काही पालकांकडून  १० हजार  तर काही पालकांकडून   ३० हजार अश्या पद्धतीने वेगवेगळ्या रकेमच्या स्वरूपात  पैसे घेतले आहेत व पालकांना कसल्याही  प्रकारची फी घेतलेली पावती दिली जात नाही.व पावती न देता पालकणांकडून हमीपत्र बनवून घेतेले जाते  अश्या प्रकारे पैसे घेणे व लेखी स्वरूपात हमीपत्र तयार करून घेणे  हे RTI कायद्याचे उल्लंघन केले  आहे . तसेच परिपत्रक क्रमांक -माशाफी १११०/(३४४/२०१०)माशि -३ नुसार सदर शाळेवर दण्ड आकारण्यात यावे .
        तसेच SNBP या शाळेमध्ये RTE मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा वेगळा वर्ग तयार केला आहे. या विद्यार्थ्यांना शाळेच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतेले जात नाही त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते.RTE मधून प्रवेश घेतेलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात  दलित समाजातून तसेच झोपडपट्टी मध्यमवर्गीय कुटुंबातील असतात एक प्रकारे  अस्पृश्य असल्याची भावना विद्यार्थ्यांच्यात निर्माण करून  त्यांच्याकडे जातीय  भेदभाव व आर्थिक भेदभाव  या मानसिकतेतून पहिले जाते आणि म्हणून त्यांना अश्या प्रकारची वागणूक दिली जाते.
               त्यामुळे या शाळेची चौकशी करून आपण   संचालक भोसले ,आशिष बनकर ,मुख्याध्यापक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी व सदर शाळेची मान्यता रद्द करावी . अश्या आशयाचे निवेदन मा. शिक्षण संचालक पुणे यांना देण्यात आले.  


                                                                  


                                                                 


अंजना गायकवाड
महिलाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र


AIMIM यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली.